अकोला - खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मलकापूर परिसरातील रहिवासी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेवानवृत्त कर्मचारी देवीदास पाचपोर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोख रकमेसह दागिने लंपास केले असून, या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवीदास सुखदेव पाचपोर (६६) हे गुरुवारी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह शेगाव येथे गेले होते. त्यांच्या मुलीच्या येथे मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी शेगाव येथेच असताना त्यांना त्यांचे शेजारी यांनी फोन करून घराचे दरवाजे तुटले असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पाचपोर यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७ आणि ३८0 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
रोख रकमेसह दागिने पळविले
By admin | Updated: March 28, 2015 01:51 IST