शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

By संतोष येलकर | Updated: January 19, 2024 20:00 IST

लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे

अकोला : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घेऊन, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि गरीब मराठा प्रवर्गाला वेगळे आरक्षण असावे, अशी आम्ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटील यांना झुलवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे जरांगे यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली असून, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे सत्तेतील श्रीमंत मराठ्यांना वाटते, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा लढा गत ३५ वर्षांपासून सुरू आहे; परंतु जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाच्या निमित्ताने या लढ्याला स्वरूप आले, आकार आला, मागणी पुढे आली असून समाजात सहानुभूती असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनासोबतच जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, विकास सदांशिव, मजर अली आदी उपस्थित होते.

गरीब मराठ्यांचा आवाज, लोकसभेत गेला पाहिजेगरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, यासाठी जरांगे-पाटील योग्य भूमिका घेतील, गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. जरांगे-पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठ्यातील नेतृत्व उभे राहिले असून, गरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन करीत, जरांगे-पाटील यांनी जी ताकद निर्माण केली आहे, त्याआधारे ते संसदेत पाेहोचू शकतात आणि तेथे गेल्यानंतर प्रश्नाचा निकाल लावता येतो, असेही आंबेडकर यांनी सांगितले.आघाडीसंदर्भात आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू !आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या संदर्भात काँग्रेसने योग्य भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भातील निर्णयाबाबत आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील