शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:08 IST

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाश्मि : वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी मंडळाने शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवशीय ‘जनता कफ्यू’ची हाक दिली. पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ‘जनता कर्फ्यूू’ला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, रस्त्यावर वाहनधारक, पादचाऱ्यांची वर्दळही दिसून आली. पुढील सहा दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला असून, मृत्यूच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. जिल्ह्यात सध्या ३०४१ रुग्णसंख्या असून, यापैकी ८५८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. वाशिम शहरात ९०० पेक्षा अधिक एकूण रुग्णसंख्या असतानाही, बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पृष्ठभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय व्यापाºयांनी १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

सहकार्य करण्याचे आवाहनवाशिम शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. जनता कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन व्यापारी मंडळाने केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक