शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

अकोला जिल्ह्यात १९ रुग्णालयांमध्ये ‘जनआरोग्य’ सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:21 IST

Akola News : आठ हजार कोविड रुग्णांना मिळाला योजनेचा आधार!

ठळक मुद्देबहुतांश कोविड रुग्णांना नाही योजनेची माहिती१६ टक्के रुग्णांनीच घेतला योजनेतून उपचार

अकोला: कोरोनाच्या गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखोंचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांना झेपणारा नाही, अशा परिस्थितीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील ८, ३२३ रुग्णांना मोठा आधआर मिळाला आहे. कोविडच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हा आकडा केवळ १६ टक्केच आहे. याेजनेंतर्गत जिल्ह्यातील १९ रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केला जातो, मात्र याबद्दल अनेकांना माहितीच नसल्याचे चित्र दिसून येते.

महत्त्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवर अनेकांनी उपचार घेतले आहेत, मात्र कोरोनावर योजनेंतर्गत उपचार होतात याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे खासगीत उपचारासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठी रक्कम मोजावी लागते. कोविडच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात ८० हजारांपासून ते दोन अडीच लाख रुपयांपर्यंतचे पॅकेजेस आहेत. उपचारासाठी लागणारा पैसा जमविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. जिल्ह्यात सद्यस्थितीत १९ रुग्णालयांमध्ये महत्त्मा फुले जन आरोग्य याजनेंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले जात आहेत. आतापर्यंत या रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील ८ हजार ३२३ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत ही आकडेवारी केवळ १६ टक्केच आहे. रुग्णाच्या गरजेनुसार विविध पॅकेजेसमध्ये योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

शेती विका, व्याजाने पैसे काढा पण पैसे भरा

कोरोना झाला की रुग्ण व त्यांचे नातेवाईक भीतीपोटी वाटेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा अनेकांकडून रुग्ण व त्यांच्या नोतवाईकांची लुट सुरू असते. उपचारासाठी लागणारा पैसा कुठुनही आणा, पण पैसे भरावेच लागतील असे खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात येते. त्यासाठी रुग्णाचे नातेवाईक स्वत:ची शेती विकतात. काही लोक व्याजाने पैसा घेतात. अशा वेळी रुग्णांना जनआरोग्य योजनेतून उपचाराची गरज असते, मात्र रुग्णांवर जनआरोग्य योजनेतून उपचार होताना दिसून येत नाही. उलट रुग्णांकडून निघेल तेवढा पैसा काढण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

गरजेनुसार पॅकेजेस

कोविडच्या प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचारही वेगवेगळा करावा लागतो. त्यामुळे जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना गरजेनुसार पॅकेजेस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र, पॅकेजेस कमी असल्याने रुग्णालयांकडून योजनेंतर्गत उपचार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही काही ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे योजनेस पात्र असूनही रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागतो.

अशी करा नोंदणी

महत्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते.

योजनेंतर्गत उपचारासाठी आवश्यक कागदपत्रे जवळ नसतील, तरी उपचार सुरू करून नंतर कागदपत्रे देता येतात.

तर करा तक्रार

रुग्णालयांनी योजनेंतर्गत उपचार नाकारल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा महात्माफुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयकाकडे तक्रार करता येते.

योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये - १९

एकूण कोरोना बाधित - ५१६४९

एकूण कोरोनामुक्त - ४४१४५

आतापर्यंत झालेले मृत्यू - ९५८

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ६५४६

योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - ८, ३२३

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतAkolaअकोला