शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

‘जलयुक्त शिवार’ कामांचा बोजवारा;  जिल्ह्यात केवळ ६०६ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:57 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

- संतोष येलकर

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांचा बोजवारा उडाला असून, उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, ४५८ कामे सुरू आहेत. उर्वरित कामे करण्यास तीन महिन्यांचा कालावधी उरला असून, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे.‘जलयुक्त’ची पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे !तालुका                          कामेअकोला                        ५४अकोट                          ९३बाळापूर                       ५६बार्शीटाकळी               २६२तेल्हारा                         ०९पातूर                            ८७मूर्तिजापूर                    ४५.........................................एकूण                         ६०६१३१४ कामे प्रलंबित !जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रस्तावित कामांपैकी ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित १ हजार ३१४ कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेली जलयुक्त शिवारची कामे संबंधित यंत्रणांकडून केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.मंजूर निधी ३५ कोटी; खर्च केवळ ५ कोटी !जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांसाठी ३५ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या ६०६ कामांवर केवळ ५ कोटी १७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी खर्च केव्हा होणार आणि कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार