मूर्तिजापूर तालुक्यात १२ गावात 'जलसमृध्दी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:49 PM2021-06-25T16:49:58+5:302021-06-25T16:50:09+5:30

'Jalsamrudhi' in 12 villages in Murtijapur taluka : मधापूरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात मोठी कामे झाली आहेत.

'Jalsamrudhi' in 12 villages in Murtijapur taluka | मूर्तिजापूर तालुक्यात १२ गावात 'जलसमृध्दी'

मूर्तिजापूर तालुक्यात १२ गावात 'जलसमृध्दी'

Next

-संजय उमक
मूर्तिजापूर :  तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे हाती घेऊन ती पुर्णत्वास नेण्यात आली आहे. यामुळे जलपातळी वाढली असल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने कृषी विभाग, जिल्हा परिषद, वनविभाग, व पंचायत समिती यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यास मदत झाली.
         सन  २०१८-१९ मध्ये तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. यामध्ये धानोरा खुर्द, गणेशपूर, हयातपूर, इसापूर, जितापूर नाकट, मंडूरा, माटोडा, पिशवी, सैदापूर, सिंकंदरपूर, सोनाळा, उमरी या १२ गावात अभियान राबवून येथील ढालीचे बांध, शेततळे सिमेंट नाला बांधकाम, गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला खोलीकरण व सरळीकरण, नाला दुरुस्ती, साखळी सिमेंट क्रॉंक्रीट नाला बांधकाम व रुंदीकरण, खोदतळे, ई क्लास शेततळे, गावतलाव दुरुस्ती. खोल सरळ समतल चर, रिचार्ज शाप्ट, विहिर व बोअरवेल पुनर्भरण आदी कामाचा समावेश असून यासाठी १७ लाख ३१ हजार खर्च करण्यात आला. या व्यतिरिक्त  भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने 'सुजलाम् सुफलाम्'  या अभियानात तालुक्यातील मधापूरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात मोठी कामे झाली आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. किनी फणी, राजनापूर खिनखिनी येथे सर्वाधिक काम झाले असून मधापूरी येथे मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली असून येथील तळे 'मॉडेल' ठरले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात प्रशासकीय मंजुरी मिळालेले ७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी कामे पूर्ण करण्यासाठी सदर गावाचा एक सर्वे करून तेथील गुरे, लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यकते नुसार जलयुक्त शिवाराची कामे करण्यात येते.
 
जलयुक्त शिवार अभियान अभियानांतर्गत ही कामे राबली जातात २०१८-१९ च्या अभियानात ७४ कामे पुर्णत्वास गेली आहेत यात शेततळे व नाले खोलीकरण महत्त्वाचे ठरले या कामाचा जलपुर्ती निर्मिती अहवाल सादर करण्यात आला. गतवर्षी पासून अभियान शासन स्तरावर बंद आहे.
-अमृता काळे
तालुका कृषि अधिकारी, मूर्तिजापूर

Web Title: 'Jalsamrudhi' in 12 villages in Murtijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.