अकोला : शहरातील कंत्राटदार नागेश जाधव (५५) यांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे नागेश जाधव सकाळी व्यायाम करण्यासाठी वसंत देसाई स्टेडियमवर गेले होते. यावेळी सूर्यनमस्कार करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मैदानावर उपस्थित नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर जाधव त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता, याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूर्यनमस्कार करताना जाधव यांचा मृत्यू
By admin | Updated: January 26, 2017 10:17 IST