शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 10:06 IST

Break the chain : हे ब्रेक द चेन नव्हे एक प्रकारचे लॉकडाऊनच असल्याचे व्यावसायिकांकडून म्हटले जात आहे.

ठळक मुद्देदुकाने बंद असल्याने आर्थिक फटका छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण

अकोला : कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अभियान? सुरू आहे. मात्र, त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. दुकाने बंद असल्याने गळ्यातील चेन मोडायची वेळ व्यावसायिकांवर आली असून आर्थिक फटका देणारे हे कसले ब्रेक द चेन अभियान? असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसायास सुरुवात केली. गाडी पुन्हा रुळावर येत असताना दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा व्यापारी संघटनांकडून विरोध होत आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यावसायिक आणखी संकटात सापडले आहेत. दुकानात माल पडून असून व्यापाऱ्यांचे पैसे थकले आहे. अनेकांना घर चालविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हे ब्रेक द चेन नव्हे एक प्रकारचे लॉकडाऊनच असल्याचे व्यावसायिकांकडून म्हटले जात आहे.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?

लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या. व्यापाऱ्यांच्या मालाचे पैसे व कर्जाचे हप्ते थकले. लॉकडाऊननंतर दोन-तीन महिने व्यवसाय सुरू होता. त्यामुळे मागील नुकसानीतून उभरताही आले नाही. आता हे कर्ज कसे फेडायचे, ही समस्या उभी राहिली आहे.

 

सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय

 

वारंवार लॉकडाऊन होत असल्याने व्यवसाय ठप्प राहत आहे. त्यामुळे घर खर्च चालविणे कठीण झाले आहे. मुलांच्या शाळेच्या फी, दुकान भाडे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

-आशा जैन, गृहिणी

 

छोटा व्यवसाय असल्याने गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले. थोडे-थोडे करून हप्ते फेडत आहे. मात्र, या कोरोनामुळे कर्ज फेडणे शक्य होत नाही. घरात नेहमी तणावाचे वातावरण असते.

-पूजा पाटील, गृहिणी

 

मसाल्यांपासून तेलापर्यंत सर्व महागले आहे. दुकान बंद राहत असल्याने घरात पैसे नाही. त्यामुळे घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न पडला आहे. आणखी काही दिवस असेच राहिल्यास कर्ज काढून घरखर्च भागवावा लागेल.

-शशीकला पवार, गृहिणी

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस