शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

बाळापूर नव्हे, हे तर ‘खड्डापूर’

By admin | Updated: August 11, 2014 00:52 IST

बाळापुरातील बसस्थानक चौक, प्रमुख मार्ग व इतर मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने 'रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ते' असा संभ्रम

बाळापूर : अकोला जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील महत्त्वाचे शहर व व्यापारी पेठ असलेल्या बाळापुरातील बसस्थानक चौक, प्रमुख मार्ग व इतर मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने 'रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ते' असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शहराला 'बाळापूर म्हणावे की खड्डापूर', असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.वीटभट्टय़ांसाठी केवळ जिल्हय़ातच नव्हे, तर विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या बाळापुरातील रस्ते खड्डय़ांनी व्यापले आहेत. शहरातून जाणारा अकोला-खामगाव मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे मुख्य मिरवणूक मार्ग, तहसील मार्ग, मन नदी ते म्हैस नदी दरम्यानचा मार्ग अशा विविध मार्गांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारक व पादचार्‍यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाने २0११ मध्येच या मार्गांचे डांबरीकरण केले होते. परंतु अल्पावधीतच या रस्त्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आजरोजी दिसून येत आहे.बाळापूर बसस्थानक परिसरातही खड्डय़ांचे साम्राज्य पसरलेले दिसते. नगर परिषदेने स्वत:च्या जागेवर बसस्थानक बांधून नाममात्र भाडेतत्त्वावर ते एसटी महामंडळाला दिले आहे. गत चार वर्षांपासून बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी थेट बसस्थानक परिसरात जमा होते. त्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण होऊन त्यात घाण पाणी साचले आहे. पाण्यामुळे खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा बसेस या खड्डय़ांमधून गेल्याने प्रवाशांना जोरदार हादरे बसतात. बसस्थानक परिसराच्या दुरुस्तीची जबाबदारी एसटी महामंडाळाची असून, परिसरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली बांधून देण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याने बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्याची समस्या निकाली निघण्याची सुतरामही शक्यता नाही. दोघांकडूनही जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असून, त्यात सामान्य बाळापूरकर भरडल्या जात आहेत. साचलेल्या घाण पाण्यामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दुरुस्तीनंतर अल्पावधितच रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधितांनी याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.