बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:08+5:302021-05-14T04:18:08+5:30

.............................. मोर्णा नदीपात्रात पुन्हा अस्वच्छता अकोला : शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी स्वच्छता अभियान राबविले होते. तसेच शासनस्तरावर ...

It is mandatory to continue outpatient department even in the evening! | बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक !

बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक !

Next

..............................

मोर्णा नदीपात्रात पुन्हा अस्वच्छता

अकोला : शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी स्वच्छता अभियान राबविले होते. तसेच शासनस्तरावर नदी सौंदर्यीकरणाचे कामही हाती घेण्यात आले हाेते. मात्र, काही वर्षांतच शासनासह अकोलेकरांना या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अनेक जण नदीपात्रातच कचरा टाकतात. शिवाय, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याने नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

..............................

सिव्हिल लाइन रस्त्याची दुरुस्ती

अकाेला : शहरातील नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला आहे. दरम्यान, सिव्हिल लाइन चाैकात सिमेंट रस्त्यावर उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली हाेती. अखेर मंगळवारी कंत्राटदाराने या चाैकातील रस्त्याची दुरुस्ती केली.

..............................

नागरिकांचे उघड्यावर वास्तव्य

अकाेला : शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी मनपाने निवारा उभारला आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. या प्रकाराची मनपाने दखल घेण्याची गरज आहे.

..............................

नालीची उंची वाढवली; रहिवासी त्रस्त

अकाेला : अग्रेसन चाैकासमाेर क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ भागाकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

..............................

मुख्य नाला घाणीने तुडुंब

अकाेला : शहरातील माेहन भाजी भंडारजवळील मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे. नाल्यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाॅटलचा खच साचल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी तुंबल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घाण, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

..............................

डम्पिंग ग्राउंडवर धूर; नागरिकांच्या जीवाला धाेका

अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. कचऱ्याला आग लागून धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असून हवा प्रदूषित झाली आहे.

..............................

मैदानाला काटेरी झुडपांचा विळखा

अकाेला : जुने शहरातील डाबकी राेडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला काटेरी झुडपांनी विळखा घातला असून अतिक्रमकांनी झाेपड्या उभारल्याचे समाेर आले आहे. मैदानालगत नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शाैचालय असून त्या ठिकाणीसुद्धा लाकूड व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

..............................

दिवसाही पथदिवे सुरूच

अकोला : शहरातील खडकी परिसरातील पथदिवे दिवसाही सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. असाच प्रकार शहरातील इतर भागातही दिसून येत आहे. मात्र, काही भागात अजूनही पथदिव्यांअभावी रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

..............................

रुग्णालयातच नाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

अकोला : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, अशा परिस्थितीत मास्कचा वापर करून इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे; परंतु सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषत: एक्स-रे, सोनोग्राफीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांनाही एक्स-रेसाठी पाठविण्यात येते. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना संसर्गाचा धोका आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: It is mandatory to continue outpatient department even in the evening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.