शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 शिक्षकांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:11 IST

आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अकोला: प्रभागातील मूलभूत समस्या निकाली काढण्यात कुचकामी ठरणाऱ्या महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांना शिक्षकांचा पुळका आल्याचे दिसत आहे. पदाधिकारी व नगरसेवकांच्या दबावतंत्राला बळी पडत शिक्षण विभागाने मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय बदली प्रक्रिया राबवली. या प्रकाराला आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी आयुक्तांकडे तगादा लावल्या जात असल्याची माहिती आहे.नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच काही कामचुकार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले होते. दुचाकी किंवा इतर वाहनाने शहराच्या कोण्याही कोपºयात पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त १५ ते १८ मिनिटांचा अवधी लागतो; परंतु काही आळशी शिक्षक चक्क स्वत:च्या प्रभागातील शाळेमध्ये बदली करून घेण्यासाठी नसती उठाठेव करताना दिसून येतात. अशा शिक्षकांना ताळ््यावर आणण्याऐवजी लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी तसेच नगरसेवक त्यांच्या सुरात सूर मिसळतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रणालीत सुधारणा व्हावी यासाठी कधीही जाहीररीत्या पुढाकार न घेणाºया शिक्षक संघटना बदलीसाठी आग्रही असतात. नेमक्या अशा प्रकारातूनच शिक्षण विभागाकडे ३३ पेक्षा जास्त नगरसेवक ांनी शिक्षकांच्या बदलीसाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. यातील काही पदाधिकारी व प्रभावी नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते माप देण्याच्या धावपळीत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय ३१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती आहे. हा प्रकार समजताच आयुक्त संजय कापडणीस यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.पदाधिकारी-नगरसेवक तोंडघशीआयुक्त संजय कापडणीस यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया रद्द केल्यामुळे शिफारस पत्र देणारे मनपा पदाधिकारी व नगरसेवक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. तीन वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ सेवा बजावणाºया शिक्षकांची बदली कशी होऊ शकते, यावर पदाधिकारी-नगरसेवकांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष; शाळांची व्हावी तपासणीमहापालिकेच्या काही शाळेत केवळ शिक्षिकाच कार्यरत आहेत. तर काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निकषापेक्षा जास्त आहे. स्वार्थी शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेत गरजू शाळेतील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आयुक्तांनी मनपा शाळांची आकस्मिक तपासणी केल्यास अनेकांचे खरे चेहरे उघड होतील, हे निश्चित आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTeacherशिक्षक