शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणात अडसर ठरणाऱ्या ‘आरओबी’चा प्रश्न रेल्वे मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:02 IST

९ मीटर रुंदीच्या आरओबीचा विस्तार चौपदरीकरणात अपेक्षित आहे; मात्र १३६ कोटींच्या खर्चात त्याचा समावेश नाही.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात अडसर ठरत असलेल्या महाबीजजवळील रेल्वे ओव्हर ब्रीज म्हणजेच आरओबीचा विषय आता थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आरओबी बाबत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहेशिवर ते रिधोरा या जुन्या मिनी बायपासच्या चौपदरीकरणाची सुरुवात वृक्षकटाईने सुरू झाली. वृक्षतोडीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने पीकेव्ही-महाबीजवळच्या रेल्वे ओव्हर ब्रीजच्या विस्तारासाठी ६० मीटरचा स्पॅन सोडून पिल्लर उभारणीची अट टाकली आहे. ही अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास शक्य नसल्याने चौपदरीकरणाच्या सुरुवातीचा अडसर निर्माण झाला आहे. जर त्यातून मार्ग निघाला नाही तर येथे बॉटेल नेक तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत लोकमतने विस्तारपूर्वक वृत्त प्रकाशीत केले. त्यामुळे कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने यामध्ये स्वयंस्फूर्तीने उडी घेऊन रेल्वे प्रशासनाने अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. या चौपदरीकरणात महाबीजजवळ रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे. अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर हा आरओबी ६१ वर्षांपूर्वी बांधलेला आहे. ९ मीटर रुंदीच्या आरओबीचा विस्तार चौपदरीकरणात अपेक्षित आहे; मात्र १३६ कोटींच्या खर्चात त्याचा समावेश नाही. जर दक्षिणमध्य रेल्वेच्या ६० मीटरची अट पूर्ण केली तर या आरओबीमध्येच मोठा निधी खर्च होईल. त्याकरिता रेल्वे मंत्रालयाने शिथिलता द्यावी, अशा मागणीचे पत्र रेल्वे मंत्र्यांकडे पाठविले आहे.

रेल्वे मंत्री गोयल यांना २३ नोव्हेंबर रोजी पत्र पाठविले असून, त्यात ३० मीटर आरओबीला परवानगी देण्याची मागणी आम्ही केली आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेदेखील आम्ही पत्र पाठविले आहे.- अशोक डालमिया,राष्ट्रीय सचिव, कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल