शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:40 IST

कारंजाच्या सह निबंधकांकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा होवून २१ वर्षे झाले असतानाही या जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा पणन अधिकारी नसल्याने सदर अधिकाºयाची नियुक्ती करण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बसपाचे राहुलदेव मनवर यांनी विभागीय आयुक्त महसूल, अमरावती यांना अमरावती येथे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन कारंजाच्या सह निबंधकांकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातील शेतकरी नापिकीमुळे त्रस्त असल्याने सोयाबीन, ऊडीद, मुग, तुर, चना नाफेडमार्फत खरेदी केल्या जाते. या योजनेचा देखरेख आधिकारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी असतो, मात्र वाशिम येथील खरेदी प्रक्रियेचा प्रभार अकोला येथील पणन अधिकाºयांकडे आहे. यामुळे नाफेडमार्फत शेतमाल खरेदी करण्यात अनेक अडचणी येतात. ही समस्या सोडविण्यासाठी वाशिम जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा पणन अधिकाºयाची नियुक्ती करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे राहुलदेव मनवर यांनी  विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी २६ नोव्हेंबर रोजी पणन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यास तात्काळ स्वतंत्र  पणन  अधिकारी नियुक्त होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मागणीची दखल अपर निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) पुणे यांनी घेत वाशिमसाठी पणन अधिकारी म्हणून कारंजा येथील तालुका सह निबंधकांकडे तात्काळ प्रभार सोपविण्याच्या सुचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिम