शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समन्वित कृषी विकास प्रकल्पात एक कोटी ९२ लाखांची अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:44 IST

अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्‍यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्‍या गरजांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देप्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हालेखापरीक्षण अहवालात घोळ उघड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्‍यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्‍या गरजांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लेखापरीक्षणात सदर अनियमितता समोर आली आहे.शेतकर्‍यांसाठी विविध योजना समन्वित कृषी विकास प्रकल्प कार्यालयातून राबवल्या जातात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी खर्च केला जातो. शेतकर्‍यांना लाभाच्या योजना देताना शासनाने वस्तू खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करता समन्वित कृषी विकास प्रकल्प कार्यालय अकोल्याचे तत्कालीन प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांनी २0१६-१७ मध्ये खरेदी प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेत निधीचा मोठा गोंधळ झाल्याचे लेखापरीक्षण अहवालातून पुढे आले. ऑगस्ट २0१७ पर्यंतच्या खरेदी प्रक्रियेत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ झाला. कमी किमतीच्या वस्तू अधिक दराने खरेदी करण्यात आल्या. पुरवठादारांशी संगनमताने ही अनियमितता करण्यात आली आहे. त्यानंतर गद्रे ऑगस्ट २0१७ अखेरपर्यंत पदावर कार्यरत होते. त्या कार्यकाळातील आर्थिक खरेदी व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यातही मोठी तफावत आढळून आली आहे.  लेखापरीक्षणाचा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालकांकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे. याप्रकरणी झालेल्या वित्तीय अनियमितता आणि नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्यासाठी पोलिसात तक्रार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिल्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी अकोल्याचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक शैलेश पाटील यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सतीश रुपचंद गद्रे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४0९ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशनCrimeगुन्हा