शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

गुंतवणूकदाराची पाच लाखांनी फसवणूक नागपूरच्या वासनकर कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 15, 2014 01:33 IST

अकोल्यातील गुंतवणूकदाराची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला: अकोल्यातील गुंतवणूकदाराची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास नागपूरच्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील अरुण साहेबराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी तीन वर्षांपूर्वी नागपूरमधील शिवाजी नगरातील वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांना वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीचे जयस्वाल रोड नागपूर येथे राहणारे प्रशांत जयदेव वासनकर(४२), लक्ष्मी रोड नागपूर येथे राहणारे अभिजित चौैधरी आणि शिवाजी नगर नागपूर येथे राहणारी विथिला विनय वासनकर या लोकांनी वासनकर कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या आणि आकर्षक व्याज देणार्‍या योजना आहेत आणि या योजनेमध्ये सहभागी झाल्यास गुंतवणूकदाराला ३0 महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम आणि तिही व्याजासहित मिळेल, अशा प्रकारची आमिषं दाखविली. या आमिषाला अरुण देशमुख यांनी बळी पडून कंपनीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी तीन महिन्यांनंतर दामदुप्पट योजनेच्या माध्यमातून १२ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून आपल्याला ११ लाख रुपयांचा धनादेश ४ जानेवारी २0१४ रोजी दिला. हा धनादेश आपण देना बँकेमध्ये वटविण्यास टाकला; परंतु कंपनीच्या खात्यात पैसे नसल्याने हा धनादेश अनादरीत झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे अरुण देशमुख यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. अखेर शनिवारी अरुण देशमुख यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेत, आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी वासनकर कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४0६, ४७१, १२0 ब नुसार गुन्हा दाखल केला. बॉक्स: वासनकर कंपनीमध्ये अकोल्यातूनही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीने शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा नागपूरच्याच वासनकर कंंपनीने फसवणूक केल्याची बाबसुद्धा यापूर्वीच उघडकीस आली होती; परंतु गुंतवणूकदारांनी तक्रार दिली नव्हती. श्रीसूर्या कंंपनीप्रमाणेच वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने शहरात गुंतवणूकदारांचे मेळावे, सभा घेऊन त्यांना वेगवेगळी आमिषं दाखविले. त्यानुसार शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. वासनकर कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर अकोल्यातील एकाच गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे आला.