अकोला: समाजसेवा करण्याच्या माध्यमातून एका ३९ वर्षीय विवाहित महिलेशी आधी ओळख बनविली. परिचय वाढविला आणि घरी बोलाविले. घरी कुणी नसल्याची संधी साधत, युवकाने महिलेचे बळजबरी लैंगिक शोषण केले. त्यानंतर ब्लॅकमेल करून सातत्याने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी खदान पोलिसांनी सोमवारी सकाळी युवक व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. खदान पोलीस ठाण्यात विवाहित पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडितेची आरोपी राहुल श्रावण मस्के (रा. न्यू खेताननगर) याच्याशी सामाजिक कार्यातून ओळख झाली. परिचय वाढला. आरोपी राहुल मस्के याने महिलेला विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये घरी बोलावून घेतले. घरात कुणी नसल्यामुळे त्याने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान पीडितेला ब्लॅकमेल करून तो सातत्याने अत्याचार करायचा. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगतो, असे म्हणत तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणीसुद्धा केली. महिलेने त्याला ५ हजार रुपये दिले. मात्र आरोपीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे महिलेने त्याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी राहुल मस्के याने तिच्या घरी जाऊन तिला व नवऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ३४२, ३५४, ३७६, ३८४, ५०४, ५०६(३४) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात एपीआय योगेश वाघमारे करीत आहेत.
समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 11:11 IST
Crime News Akola : पीडितेला ब्लॅकमेल करून तो सातत्याने अत्याचार करायचा. ही बाब तुझ्या नवऱ्याला सांगतो, असे म्हणत तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणीसुद्धा केली.
समाजसेवेतून केली ओळख, नंतर केले लैंगिक शोषण
ठळक मुद्देपाच हजारही उकळलेगुन्हा दाखल