शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्या कॉँग्रेसच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:58 IST

अकोला शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी मुलाखती आयोजित केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला टक्कर देण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे. त्यामुळे तिकीट वाटपाची प्रक्रिया लवकर व्हावी, या उद्देशाने अकोला शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी मुलाखती आयोजित केल्या आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती स्वराज्य भवन येथे होत आहेत. पाचही मतदारसंघांसाठी तब्बल ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या मुलाखतीला प्रदेश काँग्रेसकडून बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार राहुल बोंद्रे तसेच राहुल ठाकरे यांना निरीक्षक नियुक्त केले असून, यावेळी त्याच्यासमवेत जिल्हा निवड मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित राहतील. या मुलाखती दरम्यान उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करू नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी व कार्याध्यक्ष सुनील धाबेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे. मित्रपक्षांसाठी सोडलेल्या मतदारसंघातही दावेदारीविधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांसाठी अर्ज आले आहेत. मूर्तिजापूर हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसला आतापर्यंत आघाडीमध्ये देण्यात आला आहे. तेथे तब्बल सहा उमेदवारांनी दावा दाखल केला आहे. अकोला पश्चिमसाठी सर्वाधिक इच्छुकअकोला पश्चिम या मतदारसंघावर राष्टÑवादी काँग्रेसने दावेदारी सांगितली असली, तरी या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून सर्वाधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. तब्बल १६ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असल्याने या मतदारसंघावरून आघाडी धर्म अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अकोला पूर्व मतदारसंघासाठी केवळ तीन उमेदवारांचे अर्ज आले आहेत. राज्य निवड मंडळाची ६ आॅगस्टला बैठकजिल्हा स्तरावरील मुलाखती आटोपल्यानंतर मुंबईत टिळक भवन येथे राज्य निवड मंडळाची ६ ते ७ आॅगस्ट दरम्यान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेत बैठक होईल. यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील. या बैठकीला शहर आणि जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश कॉँग्रेसचे निरीक्षक आणि जिल्हा प्रभारी उपस्थित राहतील. अमानकर यांनी मागितली अकोटमधून उमेदवारी!उपजिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अशोक अमानकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असून, अकोट मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. अकोटमध्ये तब्बल ११ उमेदवार स्पर्धेत आहेत. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणElectionनिवडणूक