शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:20 IST

हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका गोडाउनमधून तब्बल १६ लाख रुपयांच्या सिगारेटस्सह मुद्देमाल पळविणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी यश आले. चोरट्यांच्या टोळीने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चो­ºया केल्याची माहिती समोर आली आहे. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोडाउनमधून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असलेल्या चोरट्यांच्या टोळीने १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. याप्रकरणी गोडउन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चोरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी एक महिन्यापासून या चोरट्यांवर पाळत ठेवून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून ताब्यात घेतले. यामध्येअकबर खान ऊर्फ अवघड चोरवा हबीब खान वय ३२ वर्षे सय्यद हुसेन ऊर्फ सोनू सय्यद हबीब वय २१ वर्षे व जुममन शाह सुलेमान शाह ३३ वर्ष तिघेही राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तीनही चोरट्यांनी १६ लाख ८० हजार रुपयांच्या सिगारेटसह मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तीनही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही चोरट्यांना ३0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरट्यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चो­ºया केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, जयंता सोनटक्के, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे ,किशोर सोनवणे, वसीमउद्दीन शेख, विशाल मोरे, लीलाधर खंडारे यांनी केली. त्यांना सायबर पथकाने तांत्रिक मुद्द्याचे सहकार्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी