शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या गाडीतून पडलेल्या 'त्या' दोघांना वाचविण्यासाठी इंटरसिटी एक्स्प्रेस परत मागे धावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 22:12 IST

दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील बार्शिटाकळी-लोहगड या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. १७६४१ काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस मधून एक महिला व एक पुरुष खाली पडले.

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील बार्शिटाकळी-लोहगड या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. १७६४१ काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस मधून एक महिला व एक पुरुष खाली पडले. त्यानंतर, घटनास्थळापासून अर्धा किमी दूरवर जाऊन थांबलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसने, गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्या दोघांना घेण्यासाठी परत अर्धा किमी विरुद्ध दिशेने प्रवास केला. 

सायंकाळी 4.45 वा. वाशीम रेल्वेस्थानाकवरून निघालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसमधून हे दोघे प्रवास करीत होते. बार्शिटाकळी ते लोहगड दरम्यान असलेल्या 92 क्रमांकाच्या रेल्वे फाटकाजवळ हे दोघेजण धावत्या गाडीतून खाली पडले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती रेल्वे गार्डला दिल्यानंतर, गार्डन रेल्वे चालकाशी संपर्क साधून गाडी थांबवली. स्तोवर ही गाडी घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर लांब गेली होती. गाडीतून खाली पडलेल्या त्या दोघांना ताबडतोब रुग्णालयात हलविता यावे यासाठी रेल्वे चालकाने बार्शिटाकळी व लोहगड या दोन रेल्वे स्थानकांच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधून घटनास्थळापासून दूर गेलेली गाडी परत अर्धा किलोमीटर मागे घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील त्या दोघांना घेऊन इंटरसिटी एक्सप्रेस 7.15 च्या दरम्यान अकोल्याकडे निघाली. 

दरम्यान जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका बोलाविण्यात आली होती. दोघांनाही अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी 'लोकमत'ला दिली. धावत्या रेल्वेतून ते दोघे कसेकाय पडले हे गुढ अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, दोघेही शुद्धीवर आल्यानंतर ते स्पष्ट होईल असेही सूत्रांनी सांगितले.

यापूर्वीही घडली होती अशीच घटनायापूर्वीसुद्धा अश्याच प्रकारची घटना गतवर्षात 2017 मध्ये घडली होती.  याच दोन रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या त्या घटनेत एक युवक अकोला-काचीगुडा एक्सप्रेस मधून खाली पडला होता. आणि विशेष बाब म्हणजे त्याला वेळेससुद्धा गाडीतून पडलेल्या त्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी काचीगुडा एक्सप्रेसने एक किमीचा प्रवास विरुद्ध दिशेने केला होता. वस्मतच्या राहणाऱ्या त्या युवकास तात्काळ वाशिमच्या रुग्णालयात हलविल्यामुळे त्याचे प्राण वाचले होते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAkolaअकोला