शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ९२0 क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:21 IST

अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल  अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस  येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२0 क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून  आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपयांनी फसवणूक  केल्याचा  खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देधुळय़ातील व्यापार्‍यास पुण्यातून अटक; २७ लाखांनी केली फसवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल  अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस  येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२0 क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून  आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपयांनी फसवणूक  केल्याचा  खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कुणाल  अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल  करून, त्याला गुरुवारी पुण्यातून अटक केली. आरो पीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रामअवतार रामवल्लभ लाहोटी यांच्या  मालकीचे आशिष एंटरप्राइजेस हे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानमधून धुळे येथील  महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक कुणाल अनिल अग्रवाल याने ९२0 क्विंटल  सोयाबीनची आवश्यकता असल्याचे सांगून लाहोटी यांच्या एंटरप्राइजेसमधून तब्बल  चार ट्रक म्हणजेच ९२0 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. सदर सोयाबीन २७  लाख ७ हजार ५२८ रुपयांचे असून, लाहोटी यांनी अग्रवालला सदर रकमेची  मागणी केली. मात्र, कुणाल अग्रवाल याने या सोयाबीनची रक्कम रामअवतार  लाहोटी यांना दिली नाही. त्यानंतर ते सोयाबीन दुसर्‍याच व्यापार्‍याला परस्पर विक्री  करून, २७ लाख रुपये हडप केले. २७ लाख रुपयांचे सोयाबीन विक्री करून,  लाहोटी यांची फसवणूक केल्यानंतर कुणाल अग्रवाल हा धुळय़ातून फरार होऊन  त्याने पुण्यात मुक्काम ठोकला. या प्रकरणाची तक्रार लाहोटी यांनी २१ ऑक्टोबर  रोजी रामदास पेठ पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर  आरोपी कुणाल अनिल अग्रवाल याला पुण्यातून अटक केली. त्याला गुरुवारी  अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने  आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपी  कुणाल अनिल अग्रवाल याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ३४  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामदास पेठचे ठाणेदार  शैलेष सपकाळ यांनी केली.

चार दिवस घेतला शोधधुळय़ातील रहिवासी कुणाल अग्रवाल याने ९२0 क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री  करून फरार झाल्यानंतर पुणे गाठले. पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल  केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. गत चार  दिवसांपासून आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा  पुण्यात शोध घेऊन अटक केली. 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीCrimeगुन्हा