शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात;  टोपले, सुप, फळे विकण्याची आली पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:37 IST

Murtijapur News : अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.

- संजय उमक मूर्तिजापूर : लॉकडाऊने भल्याभल्यांना वाट दाखवली त्यात मोठ्या व्यवसायापासून ते किरकोळ मंजूरही भरडल्या गेले, अनेकांचा यामुळे रोजगार गेला आहे तर कित्येक जणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकाळात लग्न समारंभात मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली वाजंत्री व्यवसायाला परवानगी नसल्याने त्यांना सहजच या समारंभातून वगळण्यात आले. अनेक दिवस व्यवसाय नसल्याने या व्यावसायिकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी टोपले, सुप, फळे विकण्यासह हात मजूरीची कामे करावी लागत आहे.              कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय संकटात आले आहेत. याचा परिणाम हात मजूरांनाही भोगावा लागला. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने धुमधडाक्यात लग्न करणारांचे मनसूबे पार धुळीस मिळाले आहे. या कालावधीत विवाह समारंभ मोजकेच पार पडत असल्याने, या समारंभात मुख्य भूमिका असलेल्या वाजंत्री वाजविणाऱ्यांचा व्यवसाय सुध्दा ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. हा व्यवसाय महाराष्ट्रात बहूदा विशिष्ट समाजाच्या माध्यमातून चालविला जातो, मातंग जमाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे वाजंत्री वाजविनणे व बांबू आणि शिंदोळी झाडापासू फळे बणविणे यासाठी कुशल हस्त कारागीरीने ते टोपले, सुप, फळे आदी घरगुती कामासाठी लागणाऱ्या विशिष्ट वस्तू बणवतात, परंतू वाजंत्री वाजविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हाच व्यवसाय गत दीड वर्षभरापासून बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे, बॅंड व्यवसायाचे संचालकही हतबल झाले असून त्यांनाही इतर कामे करावी लागत आहे. काहींनी तर बॅंडसाठी वापरण्यात येत असलेल्या गाडीवरच आपला टोपले, सुप विक्रीचा व्यवसाय थाटला आहे.  बॅंड पार्टीत मजूरी दाखल वाजंत्री वाजविण्याचे काम करीत असणाऱ्या कलाकाराचा हा व्यवसाय बंद पडल्याने अक्षरशः उपासमारीची पाळी आली आहे तर काही इतर किरकोळ मजूरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढून आपली उपजीविका भागवीत आहे. 

 आमचा वाजंत्री वाजविण्याचा मुख्य व्यवसायच दीड वर्षांपासून बंद आहे, प्रामुख्याने चार महीने चालणाऱ्या व्यवसायावरच आम्हा एक वर्ष कुटुंब चालवावे लागते, एका बॅंड पथकात किमान ३० लोक असतात यावरच यांच्या घरची चुल पेटते, उपासमारीची वेळ आल्याने शासनाने कलांवत म्हणून मदतीचा हात पुढे करावा.-नरेंद्र आमटेगाडगेबाबा बॅंड पथक संचालक, मूर्तिजापूर गत दीड वर्षापासून वाजंत्री व्यवसाय बंद असल्याने वाजंत्री कलावंत हा आर्थिक संकटात सापडला आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा जोड धंदा अथवा व्यवसाय नाही. त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- प्रकाश आमटेसंचालक, श्याम बॅंड पार्टी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरSocialसामाजिक