शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईदपूर्वी शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:00 IST

शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी ईद सणापूर्वी म्हणजे १ जूनला शिक्षकांना वेतन अदा करण्याचे आदेश ६ मे रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अकोला: राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये १ तारखेला वेतन मिळतच नाही. पवित्र रमजान महिना व ईद सण असल्यामुळे शिक्षकांचे वेतन १ जूनलाच अदा करण्याबाबत अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेने शिक्षण संचालकांकडे मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी ईद सणापूर्वी म्हणजे १ जूनला शिक्षकांना वेतन अदा करण्याचे आदेश ६ मे रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शिक्षकांची बाजू उचलत, शिक्षकांचे वेतन १ तारखेला करण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना कधीच १ तारखेला वेतन अदा करण्यात येत नाही; सण, उत्सवाच्या काळातसुद्धा शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागते. यावरून शासनाचा निर्णय केवळ कागदावरच असल्याचे सिद्ध होते; सण, उत्सवाच्या काळातही शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने, अनेक समस्या निर्माण होतात. पवित्र रमजान महिना व ईद सणापूर्वी शिक्षकांना वेतन अदा करण्याची मागणी अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. संघटनेच्या मागणीची दखल घेत, शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी, शिक्षकांना वेतन १ जूनपूर्वी देण्याचे निर्देश राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक