शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:07 IST

अकोला : जिल्ह्यातील ५९ खदानींच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘रॉयल्टी’चा भरणा आणि उत्खननाचे मोजमाप सुरू

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील ५९ खदानींच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये खनिपट्टाधारकांनी ‘रॉयल्टी’चा केलेला भरणा आणि त्या तुलनेत खदानींमधील मुरूम, दगड इत्यादी गौण खनिजाचे करण्यात आलेले उत्खननाचे मोजमाप करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत ५९ खदानी आहेत. खदानींमधील मुरूम व दगड या गौण खनिजाच्या उत्खननापोटी जमा केलेली ‘रॉयल्टी’ची रक्कम आणि खदानींचे प्रत्यक्ष करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) मशीनद्वारे खदानींमधील गौण खनिजाचे करण्यात आलेल्या उत्खननाचे मोजमाप करण्यात येत आहे. त्यामध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत अकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांतील खदानींच्या उत्खनाची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, अकोला तालुक्यातील खदानींच्या गौण खनिज उत्खननाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील खदानींच्या गौण खनिज उत्खननाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर भूवैज्ञानिक व खनिकर्म संचालनालयाच्या ‘सर्व्हेअर’मार्फत तपासणीचा अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकाºयांकडे सादर करण्यात येणार आहे.जिल्ह्यात अशा आहेत खदानी!तालुका खदानीअकोला २२अकोट ०५बार्शीटाकळी ११पातूर ०४मूर्तिजापूर १७बाळापूर ००तेल्हारा ००..................................एकूण ५९खनिकर्म संचालनालयाकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच तपासणी!जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची शासनाच्या भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत पहिल्यांदाच तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत खनिपट्टाधारकांनी ‘रॉयल्टी’पोटी जमा केलेली रक्कम आणि प्रत्यक्षात खदानींमधून गौण खनिजाचे करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात मोजमाप करून पडताळणी केली जात आहे.जिल्ह्यातील खदानींमधील गौण खनिजाच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.- अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण