....................................................
अध्यासी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण!
अकोला: जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक ९ व ११ फेब्रुवारी रोजी आयोजित ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातील ३६ सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकांसाठी नेमणूक करण्यात आलेल्या १८ अध्यासी अधिकाऱ्यांना गुरुवारी अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.
.....................................................................
शिक्षण समितीची सोमवारी सभा!
अकोला: जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली असून, या सभेत बांधकाम विभागांतर्गत कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
........................................................
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य!
अकोला: शहरातील आपातापा नाका परिसरातील रस्ता खोदण्यात आला असून, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून, उखडलेला रस्ता आणि धुळीच्या समस्येचा वाहनधारकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
...............................................................