शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आश्रमशाळेने दडविली विद्यार्थ्यांंची माहिती

By admin | Updated: November 7, 2016 02:21 IST

वरिष्ठ कार्यालयाचे आदेश वा-यावर; बोगस विद्यार्थी असण्याची शक्यता.

गणेश मापारी खामगाव, दि. ६- पाळा येथील प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यासाठी आश्रमशाळा व्यवस्थापनाने सतत टाळाटाळ केली आहे. त्यामुळे या शाळेत बोगस विद्यार्थी असण्याची शक्यता असून आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाने त्या अनुषंगाने तपासणीही सुरू केली आहे. शासकीय अनुदान लाटण्यासाठी पाळा येथे दोन वेगवेगळ्या संस्थानच्या नावावर दोन वेगवेगळ्या विभागाकडून आश्रमशाळांना मान्य मिळविण्यात आली. समाजकल्याण आणि आदिवासी विभाग अशा दोन विभागांकडून मान्यता मिळविलेल्या आश्रमशाळेमध्ये निवासी शाळा असण्यावर संस्थाचालकाने भर दिला आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण विभागाकडून २४0 विद्यार्थ्यांंच्या निवासाची मान्यता असतानाही या शाळेला लागूनच आदिवासी विभागाकडूनही ५00 विद्यार्थ्यांंसाठी निवास व्यवस्था असणारी शाळा सुरू करण्यात आली. दोन्ही विभागाकडून दरवर्षी लाखोंचे अनुदान मिळत असतानाही आश्रमशाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांंना आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या अत्याचार प्रकरणाने या शाळांमधील इतर गैरप्रकारही चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, आदिवासी आश्रम शाळेत एकूण ३८८ विद्यार्थ्यांंंचा प्रवेश दाखविण्यात आला असून यापैकी ३७७ विद्यार्थी निवासी असल्याचे दाखविण्यात आले आहे. यामध्येही १0१ विद्यार्थिनी आश्रमशाळेत निवासी असल्याबाबतची नोंद आश्रमशाळेच्या दप्तरी आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली असून त्यादृष्टीने आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांंसाठी निवास व्यवस्था नाही. केवळ शासकीय अनुदान लाटण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांंंचा भरणा या शाळेमध्ये केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला इत्तुसिंग पवार याच्याकडे वेगवेगळ्या जिल्हय़ांमधून या शाळेत विद्यार्थी आणण्याचे काम देण्यात आले होते. इत्तुसिंग हा आदिवासी विद्यार्थ्यांंंच्या पालकांना पैशाचे आमिष देऊन या आश्रमशाळेतील विद्यार्थी वाढवित होता. आश्रम शाळेत यावर्षी ३८८ विद्यार्थ्यांंंनी प्रवेश घेतल्याची नोंद असून त्यापैकी ३७७ निवासी विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी दाखविण्यात आल्याने आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांनी आश्रमशाळेकडून सर्व विद्यार्थ्यांंंचे नाव, प्रवेश तारीख, जन्मतारीख तसेच विद्यार्थ्यांंंचे आधारकार्ड मागितले होते; मात्र आश्रम शाळेने यासंदर्भात आदिवासी प्रकल्प कार्यालयाला काहीही माहिती दिली नाही. दोन आठवड्यांपूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांंंच्या माहितीबाबत आश्रमशाळेला पत्र देण्यात आले आहे. या पत्रानंतरही आश्रमशाळेने विद्यार्थ्यांंंची माहिती दिली नाही. परिणामी या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी बोगस असल्याची शक्यता आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने त्या अनुषंगाने तपासणी सुरू केली आहे. आदिवासी शाळेलाही ३३ लाखांचे अनुदानएकाच व्यवस्थापनाने वेगवेगळ्या संस्थेच्या नावावर दोन निवासी आश्रमशाळांना मान्यता मिळविली आहे. समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेसाठी दरवर्षी २५ ते ३0 लाख रुपये अनुदान घेण्यात येत असून आदिवासी विभागाकडूनही संस्थेला ३३ लाख रुपयांचे अनुदान यावर्षी अपेक्षित होते. आदिवासी निवासी आश्रम शाळेतील ३७७ विद्यार्थ्यांंंसाठी प्रति विद्यार्थी ९00 रुपये या प्रमाणे अनुदानाची मागणी संस्थेकडून होती. यापैकी काही अनुदान संस्थेला देण्यात आले आहे. सोयीसुविधा नसतांनाही अनुदानाची खिरापत वाटल्या गेली असल्याने याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे.स्वयंपाक घराची दुरवस्थानिवासी आश्रमशाळेमध्ये सर्व सोयीयुक्त स्वयंपाकगृह असणे आवश्यक आहे. या शाळेत मात्र एका जीर्ण खोलीत स्वयंपाकगृह थाटण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांंंचे जेवण उघड्यावरच केल्या जात होते. आदिवासी आश्रम शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांंंच्या प्रवेशाची माहिती वारंवार मागविण्यात आली. मात्र अद्याप पर्यंंंंतही माहिती मिळालेली नाही. विद्यार्थ्यांंंचे आधारकार्ड सुध्दा देण्यात आले नाही. -व्ही.ए. सोनवणे, प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्या.अकोला