शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी लोकसंख्येची माहिती आयोगाला द्या;  सर्वोच्च न्यायालयाचा राज्य शासनाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:36 IST

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने आयोगाला नागरिकांच्या मागासप्रवर्गाची माहिती उपलब्ध करून द्यावी, आयोगाने त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

अकोला: जिल्हा परिषदांची निवडणूक नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित करून घ्यावी, असा अध्यादेश शासनाने काढल्याने त्यावर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये अध्यादेशानुसार निवडणूक घेण्यास असमर्थ असल्याचे म्हटले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाने आयोगाला नागरिकांच्या मागासप्रवर्गाची माहिती उपलब्ध करून द्यावी, आयोगाने त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जातीसमूहाची जनगणनाच झालेली नसल्याने ही माहिती राज्य शासन कशी उपलब्ध करणार, हा मुद्दा आता महत्त्वाचा ठरणार आहे.राज्यघटनेतील कलम २४३ नुसार पंचायतींची त्रिस्तरीय रचना करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमातींसाठी आरक्षित जागांची संख्या, त्या पंचायतीमधील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसारच महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ (२) (अ), (ब)मध्ये तरतूद केली आहे. राज्यातील पाच जिल्हा परिषदांची निवडणूक घेताना राखीव जागांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत आहे. ही बाब राज्यघटनेतील आरक्षणाच्या तरतुदीशी विसंगत आहे. त्यामुळे आरक्षण ठरविण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या मागणीच्या याचिका राज्यातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल झाल्या. त्यावर राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमातील तरतुदीत बदल करण्याचे न्यायालयांनी सांगितले; मात्र सातत्याने हा प्रकार घडूनही शासनाकडून तशी दुरुस्ती झाली नाही. त्यानंतर मुदतवाढ, निवडणुकीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने राज्य शासनाला वेळ देत १ आॅगस्टपर्यंत तरतुदीत बदल करण्याची संधी दिली. तसेच २० आॅगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे राज्याच्या निवडणूक आयोगाला सांगितले. दरम्यान, राज्य शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला. त्यामध्ये नागरिकांच्या मागासप्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात त्या-त्या जिल्हा परिषदेत राखीव जागा ठेवून निवडणूक घेण्याचा आदेश दिला. या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जातीसमूहांची लोकसंख्या माहीत असणे आवश्यक आहे. ती माहिती राज्य शासनाकडून मिळाल्यास निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल, असे आयोगाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले. त्या मुद्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये निवडणूक घेण्यासाठी नागरिकांच्या लोकसंख्येची माहिती शासनाने आयोगाला द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला.

‘ओबीसीं’चा न्यायासाठी संघर्षराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागासप्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी वाशिम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणात या मुद्याची भर टाकली. त्यामुळे आता नागरिकांच्या मागासप्रवर्गातील जातीसमूहांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे, असेही गवळी म्हणाले.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोलाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय