शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

घुसर हत्याकांड; दोन आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घुसर बसस्थानकावर  पाणटपरी लावण्यावरून झालेल्या भानुदास ठाकरे हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून, याच हल्ल्यात गोपाल ठाकरे गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणातही याच आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ...

ठळक मुद्देघुसर बसस्थानकावर पाणटपरी लावण्यावरून झाली होती भानुदास ठाकरेची हत्याप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घुसर बसस्थानकावर  पाणटपरी लावण्यावरून झालेल्या भानुदास ठाकरे हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून, याच हल्ल्यात गोपाल ठाकरे गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणातही याच आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ठोठावली.घुसर बसस्थानकावर येथीलच रहिवासी गजानन जनार्दन पागृत व संतोष जनार्दन पागृत (३६) यांची पानटपरी वर्षानुवर्षांपासून होती. याच ठिकाणावर गोपाल ठाकरे यांनीही पाणटपरीचा व्यवसाय सुरू केला. ठाकरे यांनी पाणटपरी का टाकली, या कारणावरून संतोष पागृत, गजानन पागृत व गोपाल ठाकरे यांच्यात ३0 जुलै २0१४ रोजी हाणामारी झाली. ही हाणामारी सुरू असतानाच भानुदास ठाकरे हे वाद मिटविण्यासाठी गेले; मात्र संतोष पागृत व गजानन पागृत यांनी तलवार, चाकू व धारदार शस्त्रांनी भानुदास ठाकरे यांच्यावरच हल्ला चढविल्याने भानुदास ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर गोपाल ठाकरे यांच्यावरही शस्त्राने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गोपाल ठाकरे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी गजानन जनार्दन पागृत व संतोष जनार्दन पागृत यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ आणि ३0७ नुसार गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासले; मात्र दोन साक्षीदार फितुर झाले. सात साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत कलम ३0२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३0७ अन्वये दोन्ही आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ठोठावली. सोबतच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी विधिज्ञ अँड. विनोद फाटे यांनी ठामपणे बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा