अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने एमआयडीसी परिसरात आयोजित अॅग्रो इंडस्ट्रीज मशीनरीज व फुड प्रोसेसिंग प्रदर्शनाचे उदघाटन उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, संस्थापक अध्यक्ष भीमराव धोत्रे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आदी मंचावर उपस्थित होते.शेतकºयांच्या विकासासाठी शेतमालावर आधारीत प्रक्रीया उद्योग जास्तीतजास्त प्रमाणात उभारणे गरजेचे असून त्यासाठी फुड प्रोसेसिंग सारखे प्रदर्शन दिशादर्शक आहे, असे सांगून देसाई म्हणाले की, अकोला येथे दाल मिल हब उभारण्यासाठी उदयोग विभागाकडून निर्णय घेतला जाईल. राज्यात एकूण दहा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, यापैकी अमरावती येथे पहिला टेक्साटाईल पार्क उभारण्यात आला आहे. पुढील टेक्साटाईल पार्क उभारण्यासाठी अकोल्याला प्राधान्य दिले जाईल. सोबतच कौशल्य विकास केंद्रही उभारण्यात येईल.देसाई पुढे म्हणाले की, एमआयडीसीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महान धरणातून एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पाण्यासाठी तात्काळ ज्या उपाययोजना करता येतील, त्या केल्या जातील. एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाचा प्रश्नही सोडविल्या जाईल, तोपर्यंत विभागीय व्यवस्थापकांनी आठवडयातील दोन दिवस अकोला येथे थांबून कामकाज पाहावे, त्याचा अहवाल दर आठवडयाला आपल्याकडे पाठवावा. अकोला येथील विमानतळाबाबतच्या अडचणी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन सोडविल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक कैलास खंडेलवाल यांनी केले. यावेळी एक्स्पो हँडबुकचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर देसाई व मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट दिली. हे प्रदर्शन ७ जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
अकोल्यात टेक्सटाईल पार्क, दाल मिल हब उभारण्यासाठी प्रयत्न करणार - उद्योग मंत्री सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 17:29 IST
अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.
अकोल्यात टेक्सटाईल पार्क, दाल मिल हब उभारण्यासाठी प्रयत्न करणार - उद्योग मंत्री सुभाष देसाई
ठळक मुद्दे अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने एमआयडीसी परिसरात आयोजित अॅग्रो इंडस्ट्रीज मशीनरीज व फुड प्रोसेसिंग प्रदर्शनाचे उदघाटन.प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर देसाई व मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट दिली. हे प्रदर्शन ७ जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.