शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

 शेतात जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - डॉ. एन. सी. पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:46 IST

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले.

अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ते म्हणाले, जे अशक्य आहे ते शक्य करणारे शास्त्रज्ञ आहेत. म्हणून येत्या काळात कृषी शास्त्रज्ञांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात १५ व १६ मार्च रोजी सौर ऊर्जा कौशल्य विकास विषयावर आंतरराष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन, आयसीएआरच्या एनएएचईपीचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा, इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष मा. पा. इंद्रमनी, डॉ. पंकज पाठारे (ओमान), डॉ. पंदेकृविचे कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व डॉ. सुरेंद्र काळबांडेयांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पटेल यांनी अक्षय ऊर्जा स्रोतांतर्गत गुजरात राज्यात उत्तम काम सुरू असून, शेतकऱ्यांना या ऊर्जेचा लाभ होत आहे. शेतीला लागणाऱ्या विजेची गरज यातून भागत असल्याने शेती उत्पादनात चांगलीच वाढ होत आहे. याला जोड म्हणून जैवखते व्यवस्थापनावर भर देऊन विषमुक्त अन्न निर्मितीवर भर देत असल्याचे सांगितले. जैवखते, कृषी अवजारे निर्मिती, अल्गीपासून बायोफ्युएल निर्मिती यासारख्या उद्योगाच्या संधी असून, मधमाशीपालन, त्यापासून सहद, फुलशेती कृषी आधारित उद्योगाचे पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. धवन यांनी मराठवाडा, विदर्भातील समस्या सारख्या असून, कृषी विद्यापीठाने कृषी उद्योग निर्मितीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. उद्योग निर्मितीत ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भाले यांनी हरितक्रांतीत कृषी अभियांत्रिकीची भूमिका मोलाची असल्याचे सांगताना सौर, वायू तथा बायोमासद्वारे ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इथेनॉल निर्मिती एक उत्तम पर्याय असून, कृषी आधारित उद्योगासाठी एक चांगला पर्याय आहे. कृषी क्षेत्रात भरपूर उद्योगाच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीच्याच मागे न लागता, कृषी उद्योग तयार करू न रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरू कता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ