शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

अकोला जिल्ह्यासाठी ३१ कोटी रुपयांचा वाढीव मागणी प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 1:55 PM

जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्यस्तर बैठक अमरावती विभाग आज अमरावती येथे बैठक आयोजित करण्यात आली होती

अकोला: अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजने अंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यानुसार अतिरिक्त ३१ कोटी ४० लाख रुपयांच्या मागणी प्रस्तावास मंजूरी मिळाली असून आता जिल्ह्यासाठी १५६ कोटी ९४ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा,असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आज   दिले.जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्यस्तर बैठक अमरावती विभाग आज अमरावती येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नाअजित पवार हे होते. या बैठकीस अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे, अमरावतीच्या पालकमंत्री ना.यशोमती ठाकूर, विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, अतिरिक्त मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गुहाड, मनपा आयुक्त संजय कापडणीस, नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर,तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादर केला. वाढीव मागणी प्रस्ताव विचारात घेता १५६ कोटी ९४ लाख रुपयांच्या नियतव्ययाची मागणी केली. अतिरिक्त मागणी ही जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकासासाठी १५ कोटी रुपये, अन्य १५ कोटी व १ कोटी ४० लाख रुपये पोलीस वाहनांसाठी अशी मागणी मंजूर करण्यात आली. शिवाय जिल्ह्यातील किल्ले नरनाळा येथील पर्यटन विकासासाठी अतिरिक्त निधी देण्यात येईल.तथापि त्यासाठी स्वयंत्र विकास आराखडा लवकरात लवकर सादर करावा, जेणेकरून अर्थसंकल्पात त्या निधीचा समावेश करू, असे ना.पवार यांनी सांगितले.जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा हा जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि मानव विकास निर्देशांक या सूत्रानुसार निधी वितरण केले जाते. त्यानुसारच आराखडा मंजूर करण्यात आले आहेत,असेही ना.पवार यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAjit Pawarअजित पवार