शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिसारच्या रुग्णांमध्ये वाढ : दूषित पाण्यामुळे वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:16 IST

आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अकोला : गत आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार संततधार पावसाने हजेरी लावली. या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड हवामानामुळे वातावरणात रोगजंतुचा प्रादूर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्रोत दूषित होतात, तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रोगजंतूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विविध आजारांनी डोके वर काढले आहे. गत आठवड्याभरात सर्वोपचार रुग्णालयात ५० पेक्षा जास्त अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटांच्या विकारात वाढ झाली असून, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आहेत; तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. असे रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.ओपीडी फुल्ल; डॉक्टरांची वानवापावसाळ्यात विविध आजारांनी डोके वर काढल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध डॉक्टरांवर ताण येत आहे. सर्वोपचारमध्ये दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत आठवडाभरात हा आकडा चार हजाराच्या घरात गेला आहे.दूषित पाणी आणि माशांमुळे धोकादूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार संभवतात. खाद्य पदार्थांवर बसणाऱ्या माशांमुळेही पोटाच्या विकारांचा जास्त धोका उद््भवतो. त्यामुळे घरात स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.अशी घ्या काळजी

  • उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळा
  • पाणी उकडूनच प्यावे
  • घरातील परिसर कोरडा ठेवावा
  • माशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छता राखा
  • लक्षणे आढळताच डॉक्टरांना दाखवा

 

पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुंना तो पोषक ठरतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकडून पिणे, उघड्यावरील पदार्थ न खाणे, स्वच्छता बाळगणे अशा प्रकारची खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो. आजारी पडल्यास आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करून घ्यावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य