शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

घरकु ल लाभार्थींची देयकासाठी अडवणूक

By admin | Updated: June 6, 2014 22:37 IST

पैसे न देेण्यार्‍यांचे दडपले जातात प्रस्ताव

सायखेड : बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये घरकुल अनुदानाच्या देयकासाठी संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांकडून लाभार्थींची अडवणूक होत असून, पैसे न दिल्यास घरकुल प्रस्तावही दडपले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.घरकुल लाभार्थींनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांना त्वरित अनुदान मिळण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जातात; परंतु बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांचे त्यांच्याच प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण नसल्यामुळे लाभार्थींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी बांधकामाच्या छायाचित्रासह प्रस्ताव आवक-जावक विभागात दिले जातात. सदर प्रस्ताव बांधकाम विभागात पाठविल्यानंतर जे लाभार्थी गैरमार्गाने पैसे देतील, त्यांचेच प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जातात. ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांची कागदपत्रे कार्यालयात धूळ खात पडतात. कधी घरकुलाचे छायाचित्र बरोबर नाही, तर कधी शौचालय नियमानुसार बांधले नाही, अशी कारणे सांगून घरकुल प्रस्ताव त्रुटीत पाठविले जातात. तालुक्यातील लाभार्थी दररोज पंचायत समिती कार्यालयात येरझारा घालतात; परंतु त्यांना कधी गटविकास अधिकारी नाहीत, तर कधी शाखा अभियंता नाहीत, अशी कारणे सांगितली जातात. चोहोगाव येथील काशीनाथ बिंबाजी इंगळे व बाळू सुखनंदन इंगळे, सायखेड येथील अरुण आनंदा तायडे यांनी घरकुलाच्या अंतिम देयकासाठी पं.स.मध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रस्ताव सादर केला. त्यांचे प्रस्तावावर गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी झाल्यानंतरीही सदर प्रस्ताव दोन दिवस दडपून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी एकाने स्लॅबचे, तर दुसर्‍याने दुमजली घरकुल बांधले आहे. या प्रकाराकडे गटविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लाभार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष कंे द्रित करून या प्रकाराला प्रतिबंध घालावा, अशी लाभार्थींची मागणी आहे.