शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'आई-बाबा मतदान कराच' उपक्रमाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:26 IST

अकोला: मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वोच्च हक्क आहे. या हक्काप्रती नागरिकांना जागृत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आई-बाबा मतदान कराच’, या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रभात किड्स स्कूल २६ मार्च रोजी करण्यात आले.

अकोला: मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला सर्वोच्च हक्क आहे. या हक्काप्रती नागरिकांना जागृत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आई-बाबा मतदान कराच’, या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रभात किड्स स्कूल २६ मार्च रोजी करण्यात आले.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदान जागृतीसंदर्भात जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत प्रभात किड्स स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांतर्गत तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती केली व एक विक्रम प्रस्थापित केला.यावेळी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, नोडल अधिकारी मनोज लोणारकर, गुणवत्ता विकास अधिकारी प्रकाश अंधारे यांच्यासह प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, प्राचार्य कांचन पटोकार व उपप्राचार्य वृषाली वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या सुदृढ आणि निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने संविधान अंगीकृत केले. मतदान करणे हा नागरिकांचा सर्वांचा हक्क तर आहेच, सोबत कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. पालक मुलांचं ऐकतात. जर मुलांनी त्यांच्या आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-भाऊंना मतदान करण्याचा हट्ट केला तर ते ऐकतीलच. त्यामुळे मुलांनी त्यांच्या सुवाच्य अक्षरात पालकांना पत्र लिहून मतदानाची विनंती करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. प्रास्ताविक ‘प्रभात’चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप अवचार यांनी केले.दोन हजार विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र!‘प्रभात’च्या नियमित प्रार्थनेनंतर घेण्यात आलेल्या या उपक्रमात प्रभातच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत त्यांच्या पालकांना पत्र लिहिले आणि मतदान करण्याची विनंती केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी