शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अकोल्याची यवतमाळवर, तर वाशिमची गोंदियावर मात

By atul.jaiswal | Updated: May 2, 2024 20:19 IST

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : वैभव लांडे, अध्ययन डागा सामनावीर

अतुल जयस्वाल, अकोला: जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला व अकोला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत गुरुवार, २ मे रोजी पार पडलेल्या दोन सामन्यांमध्ये अकोला संघाने यवतमाळ संघाला, तर वाशिम संघाने गोंदिया संघाला पराभूत केले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळविल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यवतमाळ संधाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

अकोला संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांमध्ये आठ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यवतमाळ संघाला २० षटकांमध्ये ८ गडी गमावून केवळ १५९ धावाच करता आल्या. त्यामुळे संघाला ३२ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ७९ धावा करणारा अकोल्याचा कर्णधार वैभव लांडे हा सामानावीर ठरला. पंच म्हणून आशिष सोळंके व संजय बुंदेले, तर स्कोअरर म्हणून निलेश लखाडे यांनी काम पाहिले.उमरी येथील स्व. अरुण दिवेकर क्रिंडागणावर खेळविलेल्या गेल्या दुसऱ्या सामन्यात वाशिम संघाने नाणेफेकचा कौल जिंकत गोंदिया संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोंदिया संघाने निर्धारित षटकांमध्ये ८ गडी गमावत १४६ धावा उभारल्या. वाशिम संघाने १८.४ षटकांमध्ये केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावांचे विजयी लक्ष्य गाठत सामना खिशात घातला. ३ बळी व ५२ धावा अशी अष्टपैलु कामगिरी करणारा वाशिमचा अध्ययन डागा हा सामनावीर ठरला. पंच म्हणून अनील एदलाबादकर व संदीप कपूर, तर स्कोअरर म्हणून सावरमल शर्मा यांनी काम पाहिले.

उद्घाटन सोहळा थाटात

विदर्भातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन येथील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा समिती चेअरमन शरद पाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हीसीए निवड समिती सदस्य नईम रज्जाक व चंद्रशेखर अत्राम, पंच समितीचे मंगेश खेळकर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोक ढेरे, अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार जावेद अली व विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर मंचावर उपस्थित होते. यावेळी अकोला क्रिकेट क्लबचा इराणी व रणजी ट्रॉफी खेळाडू आदित्य ठाकरे याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ खेळाडू परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, बंटी क्षीरसागर, किशोर धाबेकर, अभिजीत करणे, शेखर बुंदेले उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अविनाश देशमुख यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोला