शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रेल्वेतून उतरण्याची घाई नडणार तोच रेल्वे पोलीस मदतीला धावला, महिला थोडक्यात बचावली, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

By नितिन गव्हाळे | Updated: November 27, 2022 11:19 IST

Akola News: रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत काल मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस मदतीला धावल्यामुळे  तिचा जीव बचावला.

- नितीन गव्हाळेअकोला - रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत काल मोठा अनर्थ टळला. रेल्वे पोलीस मदतीला धावल्यामुळे  तिचा जीव बचावला.  हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या रेल्वेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करीत होती.

शनिवारी  २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफचे कर्मचारी बी.आर. धुर्वे यांना, चालू रेल्वेमधून प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी महिला पडताना दिसली. त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली अन् वेळेत महिला प्रवाशाला रेल्वेच्या बाजूला केले. या समसूचकतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला. धुर्वे यांच्या धाडसाचं कौतूक केलं होत आहे.

शनिवारी रात्री रेल्वे क्रमांक- १७६४१ काचीगुडा एक्सप्रेस अकोला स्थानकावरुन रवाना होत असताना, एक प्रवासी महिला धावत्या ट्रेन मधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी तिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून खाली रेल्वे जवळ पडली. बाजूला रेल्वेच्या पायऱ्यावरून खाली उतरत असलेल्या रेल्वे पोलिसाच्या कर्मचाऱ्याला ही महिला खाली पडताना निदर्शनास आली. त्यांनी लागलीच तिच्याकडे धाव घेतली आणि त्या प्रवासी महिलेला रेल्वेपासून बाजूला केलं. हा सर्व प्रकार अकोल्याच्या स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेAccidentअपघात