शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा तडाखा; वीज पडून सहा जखमी, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 19:01 IST

Akola, Rain, Crop loss शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.दरम्यान, जिल्ह्यात वीज पडून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील दोन जण भाजल्या गेले, तर बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद शिवारात शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या गुराख्याच्या झोपडीवर वीज पडून चौघे जखमी झाले आहेत.जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथील विजय दशरथ पिंपळे (४७) व सुनील आधार मोहिते (२५) हे दोघे शेतात गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास तालुक्यात पावसाने अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. या दोघांच्या अंगावर वीज पडून ते भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खु. नजीक शेतात शेळ््या-मेंढ्या चारणाºया गुराख्यांनी ठिय्या दिला आहे. गुराख्यांच्या ठिय्यावर वीज पडल्याने आईसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी अचानक पाऊस सुरू झाल्याने आई संध्या सदाशिव दडस (४५), मुलगी सीमा सदाशिव तडस (१८), मुलगी सपना सदाशिव तडस (१९) व मुलगा प्रवीण सदाशिव तडस (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 पिकांचे नुकसान!

 रविवारी दुपारी तीनच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात सोयाबीन, ज्वारी पिकाची कापणी करून ठेवली असताना येणाºया परतीच्या पावसाने शेतकºयांची चिंता वाढवली आहे. परतीचा पाऊस सर्वदूर झाला असून, पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.  गत दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन, ज्वारी पिकांची सोंगणीची लगबग सुरू असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जाऊ नये, म्हणून शेतकरी धावपळ करीत आहे; मात्र जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पीक भिजले. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला