वातावरण बदलाचा पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:06+5:302021-05-07T04:20:06+5:30

अकोला : मागील आठवड्यात वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे उन्हाळी मूग आणि भुईमूग या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऐन ...

Impact of climate change on crops | वातावरण बदलाचा पिकांवर परिणाम

वातावरण बदलाचा पिकांवर परिणाम

Next

अकोला : मागील आठवड्यात वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे उन्हाळी मूग आणि भुईमूग या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऐन फुलांचा बहर सुरू असताना पिके पिवळी पडून सुकण्याच्या मार्गावर आहेत. आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

--------------------------------------------------------

बेरोजगारांना हवा आर्थिक आधार

अकोला : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. दालमिल, ऑईल मिलमध्ये काही कामगार कामाला जातात; मात्र पाल्यांना काम नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

---------------------------------------

पर्यटनस्थळांचा विकास रखडला!

अकोला : जिल्ह्याला काटेपूर्णा अभयारण्यासोबत नयनरम्य पर्यटनस्थळाचा वारसा लाभला आहे. या पर्यटनस्थळांचा विकास अद्यापही झालेला नाही. अनेक वर्षांपासून विकासासाठी निधी नाही. त्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे.

----------------------------------------

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

अकोला : शहरातील डाबकी रोड, बाळापूर नाका रोड व मध्यभागातील वस्तीमधील नागरिक विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज सकाळी किंवा दुपारी वीजपुरवठा खंडित होत आहे. उन्हाचे दिवस असल्याने नागरिकांना झळा सोसाव्या लागत आहे.

--------------------------------------------

शहरात अकारण फिरणाऱ्यांची धूम

अकोला : शहरात अकारण फिरत असलेल्या नागरिकांची रॅपिड टेस्ट केली जात असतानाही अशा लोकांचे फिरणे बंद झालेले नाही. जीवनावश्यक वस्तू व मेडिसीनच्या नावावर अकारण भ्रमंती सुरू आहे. महापालिका व पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.

------------------------------------------

सालगड्याचा मोबदला वाढणार!

अकोला : दरवर्षी सालगडी ठेवून शेती काम करण्यास शेतकरी सज्ज होतात; परंतु गेल्या काही वर्षांत सततच्या नापिकीने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. संपूर्ण शेती घरी करावयाची असल्यास सालगडी ठेवावा लागतो; मात्र सालगड्याचे भाव वधारले आहेत. या वर्षी सालगड्याचा भाव लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे बोलले जात आहे.

---------------------------------------------

जिल्ह्यात २४ हजार मे. टन कोषचे उत्पादन

अकोला : जिल्ह्यात रेशीम शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत आहे. मागील वर्षी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी २४ हजार ३७२ मेट्रिक टन कोषचे उत्पादन घेतले आहे. पुढील वर्षी यात आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Impact of climate change on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.