शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील अवैध दारु अड्ड्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:06 IST

रविवारी रात्री उशिरा छापा टाकून या हॉटेलमधून तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकातील जय शंकर हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री तसेच याच हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करीत अवैध अड्डाच सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकून या हॉटेलमधून तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हॉटेल जय शंकरचा मालक लखमीचंद शंकरलाल रोहडा हा त्याच्या हॉटेलमधून देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करून तसेच दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करीत मोठा अड्डाच चालवीत असल्याच्या माहितीवरून पथकाने या हॉटेलमध्ये छापा टाकून सुनील हशमतराय फतनानी ४० रा.सिंधी कॅम्प,अहमद खान युसूफ खान २८ वर्षे रा.नुराणी मशीदजवळ खदान, जयकुमार हशमतराय फतनाणी ३६ रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प, अजहर खान फरीद खान ३२ वर्षे रा.बैदपुरा, अनवर खान आबीद खान ३७ वर्षे रा.नुराणी मशीदजवळ खदान, सदाम खान रसूल खान २८ वर्षे रा.बैदपुरा, महेश रेवाचंद फतनाणी ३८ वर्षे रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प, समीर खान मोहमंद अख्तर खान २० वर्षे रा.लालबंगला बैदपुरा, शेख अजीम शेख रहीम ३१ वर्षे रा.जिराबावडी खदान, इस्लामोद्दीन सलामोद्दीन २९ वर्षे रा.जिराबावडी खदान, साजन ताराचंद जेठाणी ४० वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प, वैभव ज्ञानेश्वर उमक २८ वर्षे रा.लोकमान्य नगर, शिवसेना वसाहत, महेंद्र नानकराम नानवाणी ४२ वर्षे रा.पक्की खोली सिंधी कॅम्प, मोईनोद्दीन इजाजोद्दीन २५ वर्षे रा.जिराबावडी खदान, संतोष नामदेवराव खडसान ४८ वर्षे रा.व्ही एच बी कॉलनी, अनिस शेख खालीद शेख ४२ वर्षे रा.उत्तरचंद प्लॉट तार फाइल, नरेंद्र बाबूलाल गंगाधरे ४५ वर्षे रा.व्ही एच बी कॉलनी तारफैल, संजय केशवराव म्हैसने ४४ वर्षे रा. तारफैल भवानी पेठ, लखमीचंद शंकरलाल रोहडा वय ५९ वर्ष रा.कच्ची खोली सिंधी कॅम्प यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर हॉटेलचालक नामे लखमीचंद शंकरलाल रोहडा याच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी