शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:17 AM2021-04-11T04:17:50+5:302021-04-11T04:17:50+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील राहेर परिसरातील शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्‍टरद्वारे वाहतूक केल्याचा प्रकार गेल्या चार दिवसापासून ...

Illegal excavation of soil from government premises! | शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन !

शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन !

Next

खेट्री : पातूर तालुक्यातील राहेर परिसरातील शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्‍टरद्वारे वाहतूक केल्याचा प्रकार गेल्या चार दिवसापासून सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

राहेर परिसरातील उतावळी नदीच्या काठावरील शासकीय जागेवर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून मातीचे अवैध उत्खनन करून हजार रुपये ट्रॅक्टरची ट्राली प्रमाणे विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये जवळपास पंधरा ते वीस ब्रास मातीचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे चित्र आहे. मातीची विक्री करणारा व्यक्ती उत्खनन केल्याचा परवाना काढल्याचे सांगून विक्री करीत असल्याची माहिती आहे. याबाबत गावातील काही ग्रामस्थांनी महसूल विभागाला संपर्क करून माहिती दिली ; मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार करा नंतरच दखल घेऊन चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने मातीचे रात्रंदिवस उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तलाठ्यास मुख्यालयी राहण्याची ‘ॲलर्जी ’

शासकीय जागेतून मातीचे अवैध उत्खनन करुन विक्री होत असल्याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तलाठ्याला दिली. परंतु तलाठ्याने रजेवर असल्याचे कारण पुढे करून कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. तसेच तलाठ्यास मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी असल्याने नागरिकांचे कामे खोळंबली आहे.

शासकीय जागेतून मातीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सर्रास सुरू असल्यामुळे महसूल बुडत आहे. त्यामुळे महसूल विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

-प्रकाश बोराडे, ग्रामस्थ, राहेर.

शासकीय जागेतून मातीचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याबाबत गावातून फोन आला होता, परंतु मी तीन दिवसासाठी रजेवर आहे. रजा संपल्यावर चौकशी करून पंचनामा करण्यात येईल.

-एस. पी. लढाड, तलाठी, राहेर.

Web Title: Illegal excavation of soil from government premises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.