शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 11:28 IST

या छापेमारीत एका ठिकाणावरून ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

अकोला : युवक व महिलांच्या आरोग्यासाठी प्रचंड घातक असलेल्या ‘स्टेरॉइडच्या इंजेक्शन’ची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणांवरून आरोग्यास घातक स्टेरॉइड इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.खोलेश्वर येथील रहिवासी याच्या मालकीचे सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाºया युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्या आणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाच वेळी छापेमारी केली. या छापेमारीत एका ठिकाणावरून ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. दुसºया ठिकाणावरून ५५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणावरून या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यासोबतच आरोग्यास घातक असलेले काही औषधे व प्रोटिन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली. स्टेरॉइडचे दुष्परिणाम घातकस्टेरॉइडचे दुष्परिणाम भयंकर असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी दिली. स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहºयावर केस येतात, तर युवकांचे हाड ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रिय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे युवकांनीच जागृत होऊन अशा प्रकारचे प्रोटिन व स्टेरॉइडचे इंजेक्शन टाळण्याची गरज असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी