शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘ओबीसीं’चे अज्ञान हेच भाजपचे भांडवल - हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 10:43 IST

Hari Narake on OBC Reservation : ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. हरी नरके यांनी सोमवारी येथे केले.

अकोला : ज्यांना आरक्षणमुक्त देश बनवायचा आहे, ते ओबीसींचे कैवारी असल्याचे भासवत असताना आपण कुठवर बळी पडायचे याचा विचार करण्याची वेळ आली असून, ओबीसींचे अज्ञान हेच भाजपचे भांडवल असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. हरी नरके यांनी सोमवारी येथे केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ‘पश्चिम विदर्भ’ विभागीय प्रबोधन शिबिरात प्रा. नरके बोलत होते.

संत तुकाराम चौकातील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते, समता परिषद प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी झाले. यावेळी रवी सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. नरके यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, लेखक उत्तम कांबळे यांनी दिवसभर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ‘ओबीसी आरक्षण आणि ना. छगन भुजबळ यांचे योगदान’ यावर बोलताना प्रा.नरके यांनी राज्यातील ओबीसी आरक्षण लढे आणि संघर्षाचा आढावा घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली. वाशीमच्या विकास गवळी यांनी जिल्हा परिषदेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका टाकल्याने देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यात जमा आहे. माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करून लोकांचा संभ्रम वाढविला आहे. सुप्रीम कोर्टाचे निकाल देशाला लागू असतात. त्यामुळे आगामी काळात जसजशा पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यात ओबीसी आरक्षण नसेल, केंद्र सरकार इम्पिरिकल डेटा द्यायला तयार नाही, देवेंद्र फडणवीसांपासून सगळे नेते म्हणतात केंद्राला डेटा मागण्याची गरज नाही, भाजपमधील ओबीसी नेते ओबीसी समाजाची घोर फसवणूक का करीत आहेत, असा सवाल प्रा. नरके यांनी केला.

सकाळच्या सत्रात रावसाहेब कसबे यांनी देशातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकत ओबीसी समूहाची सांस्कृतिक फसवणूक वैदिक व्यवस्था आजही कशी करीत आहे. हे सांगितले, तर समारोप सत्रात ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे यांनी शाहू महाराज आणि आरक्षण या विषयावर मांडणी करताना शाहू-फुले-आंबेडकरांना समजून घेतल्याशिवाय आरक्षण समजू शकत नसल्याचे सांगितले. आरक्षण मागणे म्हणजे जाती अंताचा विचार स्वीकारणे होय, गुलामीच्या साखळ्या तोडण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे, ‘जो समाज प्रश्न जागे ठेवतो आणि त्याच्यासाठी लढत राहतो त्याची प्रगती होते’ असे कांबळे म्हणाले.

 

सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज, प्रा.डॉ. संतोष हुशे , हरिभाऊ भदे, बळीराम शिरस्कार, प्रा.तुकाराम बिडकर ओबीसी नेते विजय कौशल, विलास वखरे, अनिल शिंदे, गजानन वाघमारे, सुभाष सातव, गणेश खारकर, यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शिबिरासाठी विभागीय अध्यक्ष अरविंद गाभणे, विभागीय संघटक गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, प्रा. श्रीराम पालकर, विजय उजवणे, उमेश मसने, प्राचार्य किशन मेहरे, गजानन म्हैसने, ज्योती भवाने, कल्पना गवारगुरु, माया ईरतरकर, दीपमाला खाडे, सुषमा कावरे, रामदास खंडारे, सपना राऊत, अनिल मालगे, बाळकृष्ण काळपांडे, नेहा राऊत, श्रीकृष्ण बोळे, सदानंद भुसकुटे, संजय तायडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाAkolaअकोला