शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युरिया पाहिजे असेल, तर दुसरेही खत घ्या; तुटवड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 10:08 IST

रिया खत पाहिजे असेल तर, त्यासोबत दुसरेही खत घेण्याचा आग्रह करून, युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात येत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप पिकांसाठी सध्या युरिया खतासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर युरिया खत पाहिजे असेल तर, त्यासोबत दुसरेही खत घेण्याचा आग्रह करून, युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात येत आहे.अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कापूस व इतर खरीप पिकांसाठी युरिया खताची शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे; परंतु मागणीच्या तुलनेत शेतकºयांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याने, राज्यातील विविध भागात युरिया खताचा तुटवडा असल्याची परिस्थिती आहे. त्यामध्ये युरिया खताची मागणी करणाºया शेतकºयांना प्रारंभी युरिया खत उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते; मात्र युरिया खत पाहिजे असेल तर युरिया खातासोबतच पोटॅश, मॅग्नेशियम या खतांसह कीटकनाशके घेण्याचा आग्रह शेतकºयांना करण्यात येत आहे.त्यामुळे गरज नसताना इतर खतांसोबत शेतकºयांना युरिया खत घ्यावे लागत आहे. त्यानुषंगाने कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली युरिया खतासाठी शेतकºयांची लुबाडणूक करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे.

युरिया खताचा कृत्रिम तुटवडा आठवणी युरिया खताची मागणी करणाºया शेतकºयांना युरिया पाहिजे असेल तर युरियासोबत इतर खते घेण्याचा आग्रह विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. गरज नसताना युरियासोबत इतर खते घ्यावी लागत असल्याने, शेतकºयांची लुबाडणूक होत आहे. त्यामुळे यासंदर्भात कृषी विभागाने दखल घेण्याची गरज आहे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, जि. अकोला

युरिया खतासोबत गरज नसताना दुसरे खत देण्यासाठी शेतकºयांना आग्रह करण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित खत विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.- मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र