शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

देश उन्नत करायचा असेल, तर आधी खेडी उन्नत करणे गरजेचे - डॉ. विजय भटकर

By atul.jaiswal | Updated: February 5, 2018 17:02 IST

अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळा थाटात.कृषीमंत्री पांडुरंग फुडंकर, माजी मुख्य सचिव (कृषि) उमेशचंद्र्र सारंगी, कुलगुरु डॉ.विलास भाले, कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती.या पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले.

अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती पांडुरंग फुडंकर ,माजी मुख्य सचिव (कृषी ) उमेशचंद्र्र सारंगी तसेच डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला चे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. विजय भटकर म्हणाले की, भारतात कृषि ऋषी संस्कृती असून, जगातील सर्वात जुने ज्ञानावर आधारीत कृषी  संस्कृती आहे. जगातील पहिले विश्वविद्यालय नालंदा विश्वविद्यालय होते. त्यामुळे वैदिक काळात भारताला वैभव प्राप्त होते. परंतू कालांतराने यामध्ये बदल झाला आहे. भारतातला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविद्यालयाने ग्राम पंचायती दत्तक घेवून त्याठिकाणी प्रयोग संशोधन, व आणि नविन उपक्रमासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे गावाची उन्नती होईल. उन्नत भारताच्या उदिष्टासाठी भारतातील प्रमुख शैक्षणिक संशोधन संस्था यांनी ज्ञानांची शक्ती वाढवून त्याशक्तीचा उपयोग गावामध्ये नविन तंत्रज्ञान , पध्दती आणि धोरणाचा वापर करून गावाच्या शाश्वत विकासाला चालना देणे आवश्यक आहे. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी स्वागतपर प्रास्ताविकातुन विद्यापीठाच्या वाटचालीचा आलेख उपस्थिता समोर मांडला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.यावेळी विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य माजी कुलगुरु , प्राचार्य, प्राद्यापक,संशोधक,विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी इच्छाशक्तीद्वारे आव्हानांवर मात करावी - सारंगीप्रतिकुल परिस्थीतीतही आव्हानाला मात करून आपली इच्छा शक्ती प्रबल करून अधिक आत्मविश्वासाने व सशक्तपणे विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात उभे राहावे असे प्रतीपादन कृषी विभागाचे माजी मुख्य सचिव उमेशचंद्र सारंगी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आपला मार्ग स्वत: निवडावा लागेल पुढील आयुष्यात उच्च शिक्षण प्राप्त करणे, संशोधन करणे, कापोर्रोट विभागात काम करणे किंवा पुर्णपणे नवीन मार्ग आपणासाठी खुले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांची परिस्थीती मजबुत करावयाची असेल तर विदयापीठांनी नविन वान , संकरीत बियाणे ,कृषी तंत्रज्ञान व शेतकºयांना परवडण्याजोगे किड व रोगांना नियंत्रण करण्याच्या दृष्टीने संशोधन विकसीत करणे गरजेचे आहे. यासोबतच शेतक-यांना कृषी प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी विदयापीठांनी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

२६३२ विद्यार्थ्यांना पदवीदानया पदवीदान समारंभात २६३२ पदवीधरांना पदवीदान करण्यात आले. यात बी.एस.सी. कृषीचे १७७३, बी.एस.सी. उद्यानविद्या १२३, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान १०७, बी.टेक कृषी अभियांत्रिकी १२७, एम.एस.सी.कृषी २३८, आणि पी.एच.डी.च्या ४१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकाचे वितरण करण्यात आले.

प्राध्यापकांचा गौरवउत्कृष्ट शिक्षक म्हणुन डॉ. नारायण मुरलीधर काळे यांना रजत पदक देवुन सन्नमानीत केले. यावेळेस डॉ. बी.ए. सोनुने, डॉ. व्ही. के खर्चे , डॉ. व्ही.व्ही.गभणे, डॉ. एन.एम. कोंडे, डॉ. आर. एन. काटकर, यांना उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल तसेच संशोधन कायार्साठी व विदयापीठ क्षेत्रातील शेतक-यांना तात्काळ पोचविण्यासाठी डॉ.पिके नागरे , डॉ. डी. एच. पैठणकर, डॉ. एकता बागडे, डॉ. व्ही.व्ही. सोनाळकर, व डॉ. एके सदावर्ते यांना रोख पारितोषीक देवुन सन्नमानीत करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल डॉ. गुरमित सींग बुट्टर यांना सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून संजयकुमार किसनराव कुसटकर यांना रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ