गुन्हे दाखल करायचे असतील, तर खुशाल करा; पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 PM2021-03-17T16:12:32+5:302021-03-17T16:13:18+5:30

Religious events will not stop कोरोना फक्त  महाराष्ट्रातच आहे का, या आशयाचे निवेदन विश्व वारकरी सेनेच्यावतीने देण्यात आले.

If you want to file a case, please; But religious events will not stop! | गुन्हे दाखल करायचे असतील, तर खुशाल करा; पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही!

गुन्हे दाखल करायचे असतील, तर खुशाल करा; पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही!

Next

अकोट :  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतभूमी मध्ये महाराष्ट्र सरकारने कोरोचे नाव पुढे करून एक वर्षापासून धार्मिक कार्यक्रम बंद केले आहे. मागील काही काळात सर्व वारकरी संघटनांनी आपापल्या परीने आंदोलन केले व गेल्या एक महिन्यापासून धार्मिक कार्यक्रम नियम पाळून चालू झालेले होते; पण पुन्हा कोरोणा ची लाट आली असे कारण सांगून धार्मिक कार्यक्रम बंद करण्यात आले. देशी दारूचे दुकान,मॉल, चित्रपट गृह, राजकीय मीटिंग, राजकीय मोर्चे हे सर्व चालू आहे.  . कुठे धार्मिक कार्यक्रम असला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही धाकही दाखवने चालू आहे. मुळात हे महाराष्ट्र सरकारचे चुकीचे धोरण असून कार्यक्रमावर बंदी आणणे योग्य नाही. आपण नियमावली देऊन कार्यक्रम सुरू करू शकता. सध्या उत्तराखंडमध्ये हरिद्वारला कुंभमेळा मध्ये लाखो भाविक उपस्थित आहेत.  वृंदावन मध्ये कुंभमेळ्यात लाखो भाविक आहेत, उत्तर प्रदेश मध्ये काशी, अयोध्या क्षेत्रात भाविकांना कोणतेही बंधन नाही, गुजरात मध्ये द्वारकेला, सोरटी सोमनाथ ला कोणतेही बंधन नाही आपल्या महाराष्ट्रातील भाविक भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या संख्येने दर्शनाला जात आहेत. पण इतर कोणत्याही राज्यात धार्मिक कार्यक्रमावर बंदी नाही मग महाराष्ट्रातच धार्मिक कार्यक्रमावर का बंदी, कोरोना फक्त  महाराष्ट्रातच आहे का ,या आशयाचे निवेदन आज अकोट तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार निलेश मडके  व ज्ञानोबा फड साहेब अकोट ग्रामीण पोलीस पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. व या निवेदनाची दखल सरकारने त्वरित घ्यावी आणि सरकार जर वारकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल व वारकऱ्यांच्या नम्र मागणीचा मान राखत नसेल तर आम्ही सरकारचा मान न राखता कुठेही परवानगी ला न जाता धार्मिक कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत मग भलेही आपल्याला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असल्यास खुशाल करू शकता. सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आपण धर्माचे रक्षण कराल तर धर्म आपले रक्षण करील आणि आपण जर धर्माचा नाश करायला जाल तर धर्म आपला नाश केल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन अकोट तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आले.  यावेळी ह भ प विठ्ठल महाराज साबळे विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर महाराज पातोंड, रतन महाराज वसु, श्रीधर महाराज तळेकर, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज वसु, सोपान महाराज ऊकर्डे,विक्रम महाराज शेटे, अमोल महाराज कुलट,ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, विठ्ठल महाराज खलोकार , ओंकार महाराज टौलारे, पुरुषोत्तम महाराज नेमाडे, गजानन मोडक,  गजानन फुंडकर व निखिल गावंडे  उपस्थित होते.

Web Title: If you want to file a case, please; But religious events will not stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.