शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

निदान लवकर झाल्यास कॅन्सरवर मात शक्य

By admin | Updated: April 27, 2017 01:29 IST

कॅन्सर तज्ज्ञांची माहिती : लोकमत सखी मंच व कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिसंवाद

अकोला : कॅन्सरबाबत लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. जर प्राथमिक अवस्थेतच या आजाराचे निदान झाल्यास ‘कॅन्सर’वर पूर्णपणे मात करणे शक्य असल्याची माहिती कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित यांनी दिली. ‘लोकमत’च्या एक जीवन स्वस्थ जीवन’ मोहिमेंतर्गत लोकमत सखी मंच व कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता माहेश्वरी भवन येथे ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्यासपीठावर ‘आयएमए’चे अध्यक्ष पुरुषोत्तम तायडे, तुकाराम हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. माहेश्वरी, कोकीलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. इमरान निसार शेख व डॉ. नविता पुरोहित उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाराष्ट्रात ‘लोकमत’च्या माध्यमातूनच कॅन्सरमुक्तीसाठीचा सामाजिक संदेश करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थितांच्या मनातील शंकाही दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. इमरान निसार शेख यांनी सांगितले की, कॅन्सर महिला व पुरूष दोघांनाही होऊ शकतो; मात्र पुरुषांमध्ये प्रमाण जेमतेम १ टक्का आहे. महिलांना धोका अधिक आहे; मात्र ५० टक्के महिला त्रास झाला तरी अंगावर काढतात. काही गाठ असल्याचे समजले तरी भीतीपोटी व लाजेपोटी लपवून ठेवतात. समजल्यावर उपचारासाठी येतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे उपचारही कठीण होतात. त्यामुळे स्तनात गाठ झालेली असल्यास लपवू नका. लगेचच डॉक्टरांकडे जा, असा सल्ला त्यांनी दिला. चांगला आहार घ्या, घाम येईपर्यंत व्यायाम करा. तसेच जशी शरीराची काळजी घेतात, तशी महिन्यातून एकदा पाच मिनिट काढून स्तनांची स्वत:च तपासणी करून गाठ नाही ना? याची खात्री घ्या. स्तनावर तीळ येणे, रक्त येणे, गाठ होणे ही कॅन्सरची लक्षण असू शकतात, असे सांगितले. यावेळी डॉ. इमरान निसार शेख यांनी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी कॅन्सरमुळे स्वत:चा कुटुंबीयांना गमावलेल्या सदस्याच्या समस्यांचे निरसन केले. त्यासाठी देवानेच शक्ती दिली. त्यामुळे कॅन्सर झालेल्या रुग्णाने अथवा त्याच्या कुटुंबियांनी घाबरून न जाता धैर्याने सामोरे जावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा गाडगे यांनी केले.