शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

स्वपक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक, अन्यथा इतर पक्ष वा अपक्ष!; इच्छुकांचा ‘प्लॅन बी’ तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:21 IST

या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये थेट प्रचारालाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवारांचे महत्त्व नेहमीच निर्णायक ठरले आहे. निवडणुकांनंतर जिंकलेल्या अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या आघाड्या तयार केल्या जात असल्याचे वास्तव वारंवार समोर आले आहे. 

अकोला : मतदारांच्या पसंतीचा अहवाल, आर्थिक क्षमता आणि निवडणूक खर्च उचलण्याची ताकद या निकषांवरच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे तिकीट मिळाले तर ठीक, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत अपक्ष किंवा जो पक्ष तिकीट देईल. त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, अशी ठाम भूमिका भाजपसह काँग्रेस आणि अनेक इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये थेट प्रचारालाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवारांचे महत्त्व नेहमीच निर्णायक ठरले आहे. निवडणुकांनंतर जिंकलेल्या अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या आघाड्या तयार केल्या जात असल्याचे वास्तव वारंवार समोर आले आहे. 

तिकीट मिळविण्यासाठी लावली जोरदार फिल्डिंग -राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, युती–आघाडी धर्मामुळे अनेक प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची नावे ऐनवेळी कापली जाण्याचे अनुभव यापूर्वीही आले आहेत.

त्यामुळे आधी पक्षाकडे दावेदारी, त्यानंतर तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढत, अशी दुहेरी रणनीती अनेक इच्छुकांनी आधीच ठरवून ठेवली आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.युती-आघाडीमुळे वाढणार बंडखोरी?पालिकेच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), भाजप, शिवसेना (दोन्ही गट) हे प्रमुख सहा पक्ष आहेत. या सर्व पक्षांकडे  इच्छुकांची मोठी गर्दी आहे.

पक्षाचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहूनच काही इच्छुक थेट बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Party Ticket or Independent: Aspirants Prepare 'Plan B' for Elections

Web Summary : Akola candidates eye party tickets, but many are ready to contest independently or with other parties if denied. Alliances may fuel rebellion.
टॅग्स :AkolaअकोलाMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६