शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार

By नितिन गव्हाळे | Updated: May 18, 2023 18:32 IST

या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोला : पत्नी दिसायला सुंदर नाही, तिला कामधंदा येत नाही, यावरून पती दारू पिऊन सतत शारीरिक व मानसिक छळ करतो. त्याच्या छळाला कंटाळून पत्नीने मूर्तिजापूर शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मूर्तिजापूर माहेर असलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुले असून, तिचे लग्न २०१३ मध्ये येळाबारा, ता. वडगाव, जि. यवतमाळ येथील श्यामसुंदर दयाल प्रजापती याच्यासोबत झाले.

लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर पती दररोज घरी दारू पिऊन यायचा. शिवीगाळ करून मारहाण करायचा आणि तू दिसायला सुंदर नाही. तुला कामधंदा येत नाही, असे म्हणत, छळ करायचा. मुले असल्याने, विवाहिता त्याचा छळ सहन करायची. पती सतत चारित्र्यावर संशय घेतो आणि माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावतो. दुचाकी मागितली असता, विवाहितेच्या वडिलांनी त्याला नवीन दुचाकी घेऊन दिली. त्यानंतरही पती सतत वाद घालून छळ करतो. वर्षभरापूर्वी पती श्यामसुंदर प्रजापती याने विवाहितेला घरातून हाकलून दिले. या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी