शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेंतर्गत शेकडो विकास कामे रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:08 IST

अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध २00 विकास कामांची अंदाजपत्रके सुधारित करणे सुरू आहे. त्यापैकी २0 कामांचीच निविदा प्रक्रिया आटोपली. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून निधी खर्चासाठी ३१ मार्च २0१८ च्या मुदतीत निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.

ठळक मुद्देनिविदा प्रक्रियेतून होणार्‍या कामांसाठी मुदतीचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध २00 विकास कामांची अंदाजपत्रके सुधारित करणे सुरू आहे. त्यापैकी २0 कामांचीच निविदा प्रक्रिया आटोपली. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून निधी खर्चासाठी ३१ मार्च २0१८ च्या मुदतीत निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.शासनाने सप्टेंबरमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार नवी जिल्हा दरसूची (डीएसआर) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये विविध साहित्यांचा दर हा ‘जीएसटी’सह लागू होण्यापूर्वीच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे त्या कामांची अंदाजपत्रके नव्याने करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर आली. त्यासाठी आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायतींकडून प्राप्त कामांच्या अंदाजपत्रकीय रकमेमध्ये बदल करावा लागला. त्यामध्ये जिल्हय़ातील २00 कामांची अंदाजपत्रके बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना परत करण्यात आली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून दोन ते तीन कोटींची कामे ठप्प आहेत. 

जीएसटीच्या कात्रीत ग्रामपंचायती, कंत्राटदार

  • - वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणीत भर पडली. जुलैमध्ये जीएसटी लागू झाला. तत्पूर्वीच एक जुलैच्या अगोदर सिंचन, बांधकाम, पाणी पुरवठा व अन्य विभागांच्या निविदा जाहीर झाल्या होत्या. त्यांचे अंदाजपत्रक हे २0१३-१४ च्या ‘डीएसआर’नुसार तयार करण्यात आले होते. त्याच काळात जीएसटी लागू झाल्यामुळे ही कामे जुन्या दराने करायची की नवीन करप्रणालीनुसार करायची, असा पेच निर्माण झाला. 
  • - त्यावर नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचा तोडगा काढण्यात आला. जीएसटी आणि डीएसआरनुसार होणारे फेरबदल करून नव्याने अंदाजपत्रक तयार होत आहेत. त्यातच ग्रामपंचायतींना कामे हवी असल्यास जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. सोबतच कंत्राटदारांनाही नोंदणी करावी लागली. जीएसटीच्या कात्रीत ग्रामपंचायती, कंत्राटदार आणि कामेही अडकली.

सुधारित १00 पैकी २0 कामांची निविदाजीएसटीसह सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २00 च्या संख्येत अंदाजपत्रके परत करण्यात आली. त्यापैकी २0 कामांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुरू केली. ८0 कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ६0 कामांसाठी मिळालेला निधी खर्च करण्याची मुदत मार्च २0१८ पर्यंत आहे, तर आरोग्य विभागाच्या २0 कामांसाठी शासनाकडून निधी मिळालेला आहे. 

५0 पेक्षाही अधिक कामे ग्रामपंचायतींकडेज्या १00 कामांची सुधारित अंदाजपत्रके अद्याप तयार झाली नाहीत. त्यापैकी ५0 कामे ग्रामपंचायतींना दिली जाणार आहेत. त्या कामांसाठी तीन लाखांपर्यंत निधी आहे; मात्र ग्रामपंचायतींकडून जीएसटी नोंदणी आल्याशिवाय ती दिली जाणार नाहीत, तर उर्वरित कामांचे समितीद्वारे वाटप केले जाणार आहे. ग्रामपंचायतींनाच कामे देण्यासाठी उशीर केला जात आहे. त्यामुळे मुदतीत निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद