शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान;  पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 13:14 IST

गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.

अकोला: जिल्ह्यात गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानाचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा संपला असला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. शनिवार, २६ आॅक्टोबर रोजीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. सतत बरसणाऱ्या परतीच्या पावसाने, काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन व्यस्त असल्याच्या परिस्थितीत, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मात्र रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार आणि पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सोयाबीन, ज्वारीला फुटले कोंब; कापूसही भिजला!सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेले शेतातील सोयाबीन पावसात भिजले असून, अनेक ठिकाणी सोयाबीला तसेच ज्वारीला कोंब फुटले आहेत. पावसामुळे भिजलेला कापूसही गळून पडला आहे. त्यासोबतच गळून पडलेल्या कपाशीच्या पात्या-फुलं व बोंड्या मातीत मिसळल्या असून, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड!कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंज्या शेतात लावण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसात सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून पीक वाचविण्याची धडपड शेतकºयांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग