शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पातुरात हार्डवेअरच्या गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 18:43 IST

या आगीत गोदाम व माल जळून खाक झाल्याने ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.

शिर्ला/ पातूर : पातूर शहरातील खानापूर रोडवर असलेल्या धनस्कार हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्सच्या गोदामाला २५ एप्रिल रोजी पहाटे आगआगली. या आगीत गोदाम व माल जळून खाक झाल्याने ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.बायपास परिसरात खानापूर मार्गावर श्याम धनस्कार यांचे हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्स सामानाचे गोदाम आहे. या गोदामात लाखो रुपयांचे साहित्य भरून ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाला दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल्सच्या सामानाचे पंचनाम्यानुसार ३२ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आग लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही; मात्र गोदामाचा विमा नसल्याचे समजते. गोदामाच्या बाजुलाच उभी असलेली गजानन वानखडे यांच्या मालकीची खासगी बस सुदैवाने आगीपासून वाचली. या बसचे आगीमुळे किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्याम धनस्कार यांनी तीन महिन्यांपूर्वी साडेसात लाख रुपये खर्चून गोदाम उभारले होते. त्यामध्ये धनस्कार परिवाराच्या तीन दुकानांचा माल ठेवण्यात आला होता. गटविकास अधिकारी विनोद शिंदे, तहसीलदार दीपक बाजड, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, अजय देशमुख, जयंत मसने, अजय ढोणे, रमण जैन, विजयसिंह गहिलोत, चंद्रकांत अंधारे, अंबादास उमाळे, राजू उगले, राकेशसिंह बायस व दिलीप इंगळे उपस्थित होते. आमदार नितीन देशमुख यांनी धनस्कार परिवाराला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच आग लागली की लावून देण्यात आली, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :Paturपातूरfireआग